पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२३) सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणून पोंचविले. त्या वेळी मोठ्या जयजयकाराने बक्षिसाची रक्कम त्यास अर्पण करून शिवाय गौरवार्थ त्याला चांगला पोषाखही दिला. बांधलेल्या दोराच्या आधारानें गलबताजवळ जाण्याची पडाववाल्यांस सोय झाल्यामुळे त्यांस धीर येऊन हिंमत वाढली. शिवाय आणखी एका भाटे गृहस्थाने असे जाहीर केले की, 'त्या गलबतावरील उतारू लोकांचे प्राण वाचवून त्यांस किनाऱ्यावर सुरक्षित आणून पोचविणारांस प्रत्येक उतारूमागे दोन रुपये याप्रमाणे मी बक्षीस देईन.' हे ऐकतांच बहुत पडाववाले गलबताकडे धांवले. आणि आपल्या शक्तीप्रमाणे उतारूंस पडावांत घेऊन त्यांना किनाऱ्यावर आणून पोचविण्याचा क्रम त्यांनी सुरू केला. द्रव्याच्या लालचीने व एकमेकांच्या इर्षेनें पडाववाल्यांनी त्वरा करून थोडक्या वेळांत सर्व उतारूंस किनाऱ्यावर आणून पोंचविलें. बहुत दिवसांच्या प्रवासामुळे त्या उतारूंपैकी बहुतेक लोक भुकेने व्याकुळ होऊन पडले होते, व कित्येक वस्त्रे नसल्यामुळे थंडीने कुडकुडत होते. हे पाहून आमच्या उदार भाटे लोकांस फार दया आली. तेव्हां लागलीच एकानें विलंब न लावतां धांवत जाऊन हारेच्याहारे रोट्या आणल्या, आणि त्या सर्वांस वांटल्या. दुसऱ्या एकाने तेथे कापडाचे अनेक गठे आणून सोडले आणि वस्त्रे दिली. तिसऱ्याने त्या लोकांस राहण्याकरितां सोइस्कर जागा पाहून ती भाड्याने घेतली आणि तेथे राहण्यास येण्याबद्दल त्या सर्व लोकांस निमंत्रण केले. चौथ्याने शेकडों गाड्या, रेकले व घोड्यांच्या बग्या वगैरे वाहने आणून त्यांत लोकांस वस