पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २२ ) त्यामुळे गलबत आडमार्गाने भडकलें, आणि ब्याकबेच्या समोर दाँत खडक आहे त्याच्या सांपटींत जाऊन अडकलें. तेणेकरून गलबतास मागे किंवा पुढे जातां येईना. खांबाशी बांधून ठेवल्याप्रमाणे त्याची जखडबंदी झाली. पाण्याच्या मोठाल्या लाटा उसळून त्या गलबतावर जोराने आदळू लागल्या. अशा अनेक भयंकर संकटांनी घेरल्यामुळे आतां लौकरच गलबत बुडून जाईल, किंवा फुटून त्याचे तुकडे तुकडे होतील, अशी खलाशी लोकांस भीति वाटली. गरीब बिचाऱ्या भाविक मुसलमान यात्रेकरू लोकांचे जीव समुदार्पण होणार असे पाहून सर्व लोक घाबरले. ह्या घातक स्थळी गलबत सांपडले तर दगा होतो, हे मुंबईत सर्वप्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी उतारू लोकांनी भरलेलें गलबत फसलें आहे, अशी शहरांत बातमी पसरतांच ब्याकबेवर हजारों लोकांची गर्दी जमली. त्या संकटांत पडलेल्या लोकांचे जीव कसे वांचवावे ह्याची वाटाघाट सुरू झाली. शेवटी एका उदार भाटे जातीच्या गृहस्थाने आपल्या पदरचे एक हजार रुपये बक्षीस देण्यास काढले.आणि तेथे जे पडाववाले जमले होते त्यांस जाहीर केलें की जो कोणी धैर्याने जाऊन त्या गलबतास दोर बांधून येईल त्यास हे एक हजार रुपये बक्षीस मिळतील. एवढे मोठे बक्षीस लाविले होते तरी त्या भयंकर रूप धारण केलेल्या दर्यात उडी घालण्याची कोणाची छाती होईना, पण त्या बक्षीस लावलेल्या द्रव्याच्या आशेने पडाववाले गलबताकडे जाण्याच्या प्रयत्नास लागले. त्यांतील एका हिंमतबहादराने मोठ्या प्रयासाने जाऊन त्यास दोर बांधला. आणि त्यावरील कांहीं उतारू आपल्या पडावांत घेऊन त्यांस