पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१) लोकांकडून नेहमी होत असतो. यावरून, श्रीमंतापासून गरीबापर्यंत सर्व हिंदु लोक मुसलमान लोकांचा व त्यांच्या धर्माचा तिरस्कार न करितां त्यांजवळ सन्मानपूर्वक व दयाशील अंतःकरणाने वागतात, असे होत आहे. ही गोष्ट साधारण आहे तरी सर्वत्र ठिकाणी घडत असल्यामुळे पाहिजे त्या जागी तपासून पाहणारांस दिसून येणारी आहे. ह्मणून आमच्या मुसलमान बांधवांनी त्याचा अवश्यमेव विचार करावा. आतां यापेक्षा अधिक श्रेष्ठ असेंही उदाहरण पहा-मुसलमानांच्या देवस्थानास (पिरांस) हिंदु लोक भजतात, त्यांची पूजा करितात, त्यांला नवस करितात व त्यांला कंदुरी देतात. दर गुरुवारी त्याला खेटे घालतात. मोहरमांतील डोल्यांस मलिदा देऊन त्याचे भक्त (फकीर) बनतात. फकिराचे स्पष्ट चिन्ह दाखविण्याकरितां कफन्या व नाडे धारण करितात. त्यांच्या डोल्यांपुढें धूप जाळतात. अबीर, रेवड्या व खारका उधळतात. डोले थंडे होण्यास जाऊं लागले झणजे रस्त्याने त्यांच्यापुढे हसन, हुसेन व अल्ला या नांवांचे मोठ्याने भजन करून फार प्रेमाने नाचतात. पाण्याचे हेल आणून रस्त्यांत डोल्यांपुढे रिचवितात. कित्येक हिंदु डोले करितात, व त्या प्रीत्यर्थ मोठाले खर्च करितात. हिंदुस्थानच्या सर्व भागांत श्रीमान् व गरीब हिंदु लोक मनोभावेंकरून मुसलमानी धर्माच्या देवाची मोठ्या भक्तीने सेवा करितात, हे मुसलमान बांधवांनी पहावें.. सन १८६४ साली मक्केची यात्रा करून मुसलमान लोक मुंबईस परत येत होते, त्यांचे गलबत मुंबई बंदरानजीक येण्याचे संधीस अतिशय मोठे वादळ होऊन दर्या खवळला,