पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०) काठेवाडांत जुनागड या नांवाचे मोठे संस्थान मुसलमान घराण्याकडे चालत आहे. तेथील दिवाणगिरीच्या जाग्यावर रा. ब. हरीभाई देसाई लेवा पाटीदार हे हिंदु गृहस्थ असून खेडा जिल्ह्यांतील नडियाद शहरचे राहणारे आहेत. त्यांजवर जुनागडचे नबाब साहेबांचा पूर्ण विश्वास आहे. ते दिवाणगिरीचे काम उत्तम रीतीने चालवीत असल्यामुळे त्या सरकारचे उत्पन्न पुष्कळ वाढत आहे, ही गोष्ट मुसलमान बांधवांनी विचारांत घेण्याजोगी आहे. ___ वरील सर्व उदाहरणे राजकीय संबंधाची आहेत. पण साधारण व्यवहारांत पाहिले तरी हिंदु व मुसलमान हे परस्परांशी सख्यत्वाने वागतात असे दिसून येईल. मुंबई शहरांत व्यापाराची उलाढाल फार चालते. यामुळे तेथल्या बाजारांत मेमण, खोजे, कच्छी व बोहरी इत्यादि मुसलमान धर्मी लोकांचा भरणा मोठा आहे. त्यांच्या दुकानी मेथे (कास्कून) हिंदु गुजराथी लोक असतात, असे शोध करून पाहणारांस दिसून येईल. तेथल्या शेट लोकांचा मेथाजींवर पूर्ण भरंवसा असल्यामुळे हजारों रुपये त्यांचे हाती असतात. तरी लबाडी न करितां मेथाजी आपल्या धन्यांशी फार विश्वासूपणाने वागून त्यांच्याशी नेकीने राहतात असे स्पष्ट दिसण्याजोगे आहे. मुसलमान जातीचे कित्येक गरीब फकीर लोक खैरात मागण्याकरितां हिंदु लोकांचे दारोदार जाऊन त्यांस दुवा देऊन खैरात मागतात. तेव्हां त्यांचा तिरस्कार न करितां हिंदु लोक त्यांस यथाशक्ति पैसा, धान्य, लत्ताकपडा अथवा रोटी देतात. असला धर्मादाय शहरोशहरी व गांवोगांवीं हिंदु