पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १७ ) दूर गेल्यावर मला खबर दे. ह्मणजे मग मी तुझा पोषाक धारण करून तुझ्या इतमामानें तूंच बाहेर जात आहेस अशाथाटाने दिल्लीतून बाहेर जाण्यास निघेन. त्या वेळी मी दैवयोगाने सुरक्षित निभावून आल्यास जलदीने तुला येऊन गांठीन. पण कदाचित् दुर्दैवाने माझा घात झाला तरी काही चिंता नाही. कारण स्वामिकार्याची सर्व सिद्धि मिळवून तूं साताऱ्यास जाऊन पोंचशीलच. स्वामिकार्याच्या सिद्ध्यर्थ माझा प्राण गेला तरी पुण्यच आहे. मी मेलों तरी माझ्यामागे माझ्या कुटुंबाचा तूं चांगला प्रतिपाळ करशील असा मला भरंवसा आहे. याकरितां आतां विलंब न लावतां लौकर ऊठ, तयारी कर. उशीर झाल्यास स्वामिकार्याची हानि होईल. ही त्या एकनिष्ठ स्वामिभक्ताने जिवावर उदार होण्याची मसलत दिली, ती भयंकर असल्यामुळे तिला बाळाजी प्रथम रुकार देईना, पण ह्याखेरीज दुसरा चांगला उपायच दिसेना, यामुळे निरुपाय होऊन मोठ्या कष्टानें तें साहस करण्यास बाळाजी कबूल झाला. मग लागलीच संध्याकाळच्या वेळी त्याने फकिराचा वेष घेतला, हक्कांच्या सनदा झोळीत घातल्या, आणि तो भीक मागत मागत युक्तीने दिल्ली शहराच्या बाहेर पडून आपल्या छावणीत जाऊन सुरक्षित पोंचला नंतर लागलीच कुच करून तो सर्व मंडळीसह अति त्वरेने पण सावधगिरी ठेवून मोठाल्या मजला मारीत दक्षिणेकडे बऱ्याच मजला गेला. नंतर संकेताप्रमाणे आपल्या फडणीस मित्रास त्याने खबर पाठविली. ती त्यास पोंचतांच तो बाळाजीपंताचा पोषाक धारण करून त्याच्या सर्व इतमामाच्या थाटानें दिल्ली शहराच्या बाहेर जाऊ लागला. तेव्हां टपत बसलेल्या मारेकऱ्यांनी हा