पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लीच्या बेरजेवर १ एक चतुर्थांस, व काही ठिकाणी सरदेशमुखी झणजे एक दशांश, व कांहीवर साहोत्रा झणजे एक षोडशांश असे हक्क दरसाल शाहूमहाराजांस देण्याचे ठरवून त्या हक्काच्या सनदाही लिहून त्या बाळाजीपंताच्या पदरी टाकिल्या. याप्रमाणे स्वामिकार्यांत बाळाजीपंतास यश आल्यामुळे मोठा आनंद झाला. नंतर त्याने शाहूमहाराजांच्या मातुश्रीस व राणीस आपल्या ताब्यात घेऊन दिल्ली शहराबाहेर जेथें त्याची छावणी होती तेथे नेऊन त्यांस सुरक्षित ठेविलें, आणि आपली निघण्याची तयारी केली. बाळाजीने जे नवे हक्क संपादन केले होते ते तेथल्या कित्येक विरुद्धपक्षाच्या लोकांस मानवले नाहीत. ह्मणून, बाळाजीपंत सनदा घेऊन दिल्लीच्या बाहेर निघून जाऊं लागला ह्मणजे मारेकऱ्यांच्या हातून त्याचा घात करवून त्याजवळच्या सनदा हिसकून घेण्याची त्यांनी मसलत केली. नानाफडणिसाचा पूर्वज बाळाजी महादेव भानू हा बाळाजीपंताबरोबर दिल्लीस गेला होता. त्याला ही दुष्ट मसलत समजली तेव्हां त्याने ती लागलीच बाळाजीपंतास सांगितली. यामुळे त्या उभयतांस मोठी काळजी उत्पन्न झाली, ती निवारण करण्याचा उपाय आता काय करावा ह्याचा दोघांनी विचार करितां करितां भानूने असे सांगितले की, यांतून सुरक्षितपणे निभावून जाण्यास मला एकच उपाय दिसतो, तो हा की, तूं फकिराचा वेष घे, सनदा झोळीत घाल, आणि भीक मागत मागत दिल्ली शहराच्या बाहेर पडून आपल्या छावणीत जा. तेथे गेल्यावर लागलीच बायांना घेऊन दक्षिणेत चालता हो.होईल तितक्या सावधगिरीने वागून फार जलदीने मजला मारीत