पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजीपंतच आहे अशा समजुतीने त्या स्वामिसेवानिष्ठ फडणीस पुरुषाचा रस्त्यांत घात करून त्यास ठार मारिलें. ह्या स्वामिकार्यनिष्ठ स्वदेशभक्ताने आपल्या प्राणाचा बळी देऊन ही किती मोठी कामगिरी बजाविली हे वाचणाऱ्यांनी ध्यानांत धरावें. ही गोष्ट अत्यंत प्रशंसनीय असल्यामुळे येथे सांगितली. तथापि यांतून प्रस्तुत आपणास प्राचीनकाळचे शहाणे मुसलमान लोक हिंदूंशी सदय अंतःकरणाने वागून त्यांचा सांभाळ करीत होते, एवढेच तात्पर्य ध्यावयाचे आहे. वर सांगितलेले तिन्ही हक्क निजाम सरकारच्या मुलखांतून पेशवाईअखेर मराठ्यांकडे चालत होते. त्या हक्कांपैकी साहोत्रा अमलाचा काही भाग भोरकर पंत सचीवांस दिलेला होता, तो त्यांजकडे अद्याप चालत असून त्याचा वसूल दरसाल सचीव साहेबांस निजाम सरकारांतून मिळत असतो. वायव्य प्रांतांतील अलीगड जिल्ह्यांत सर सय्यद अहमद या मुसलमान उदार गृहस्थांनी मुसलमान जातीच्या लोकांत विद्येचा प्रसार व्हावा ह्मणून कॉलेज स्थापिलें आहे. त्यांत हिंदु लोकांच्या मुलांस शिकण्याचा प्रतिबंध ठेविला नाही. यामुळे हिंदुलोकांची बहुत मुलें तेथें विद्याभ्यास करून ज्ञानसंपादन करीत आहेत, हे आमच्या मुसलमान बांधवांनी ध्यानात ठेवावें, पुण्यांत फर्ग्युसन कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल, नेटिव्ह इन्स्टिट्यूशन इत्यादि खासगी शाळा, मुंबईत अनेक खासगी शाळा, त्याचप्रमाणे बेळगांव, धारवाड, सातारा, अहमदनगर, नाशिक व नागपूर इत्यादि ठिकाणीही विद्येच्या वृद्ध्यर्थ हिंदु लोकांनी खासगी विद्यालये स्थापिली आहेत. त्या सर्वांत