पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५) प्रयत्नाने औरंगजेबाची कन्या बेगम साहेब यांजकडे धोरण बांधून उभयतां बायांची सुटका करून घेण्याचे काम चांगले रंगास आणिलें. एवढेच करून तो राहिला नाही. ह्या वेळी त्याने मराठी राज्यास लाभदायक अशी आणखी एक गोष्ट संपादन केली. बेगम साहेब व दिल्लीचे बहुतेक दरबार आपल्या मुठीत आले आहे हे पाहून योग्य प्रसंगी त्यांस बाळाजीपंताने विनंती केली की, 'आपण कृपा करून शाहूमहाराजांस कारागृहांतून सोडिले आणि राज्यावरही बसविलें, पण त्यांच्या हाती बहुत वर्षे राज्य नसल्यामुळे त्या मुलखांत फार अव्यवस्था झाली आहे. त्राता नसल्यामुळे अंदाधुंदी माजून पुष्कळ ठिकाणची वस्ती उठून गेली आहे, आणि यामुळे राज्यांतील फार मोठा जमिनीचा भाग ओसाड पडला आहे. अशा स्थितीत शाहूमहाराजांस वसूल कोठून येणार? आपल्या कृपेनें शाहूमहाराज दक्षिणेतील राज्यावर बसले खरे, पण खर्चास पुरेसें उत्पन्न नसल्यामुळे ते फार संकटांत व हालांत पडले आहेत. आपण दयाळूपणाने त्यांच्या खर्चास पुरेसे आणखी काही उत्पन्न करून दिल्यास त्यांचा गुजारा होईल. नाही तर त्यांस पराकाष्ठेचे दुःख सोसावे लागेल! याप्रमाणे बाळाजीने अति लीनतेने केलेली विनंती ऐकून बेगम साहेबांस व तेथे हजर असलेल्या दरबारी मुत्सद्यांस शाहूची दया येऊन त्यांची मने द्रवली, तेव्हां शाहूच्या खर्चास मदत होण्याजोगें उत्पन्न कोठे व काय द्यावे ह्याचा विचार व खल त्यांच्यात सुरू झाला. शेवटी, दक्षिणेतील निजामाच्या सहा सुभ्यांवर काही ठिकाणी चौथाई ह्मणजे जमीनवसु