पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

थल्या दरबारांतून त्यांची सुटका करून आणण्याजोगा चतुर, विश्वासू व हिंमतीचा असा मनुष्य त्यास कोणी दिसेना, त्यामुळे त्याला कांहींच गोड वाटेनासे झाले. ह्या कामास योग्य असा मनुष्य ध्यानांत आणतांआणतां बाळाजी विश्वनाथ, आडनांव भट, (ह्यासच पहिला पेशवा ह्मणतात) हा पुरुष शाहूच्या मनांत भरला. नंतर लागलीच त्याने त्यास ह्या कामगिरीवर पाठविण्याची योजना करण्याचे ठरविलें. 'तूं दिल्लीस जाऊन ही कामगिरी बजावून येशील का?' असें शाहूमहाराजांनी बाळाजीपंतास विचारिलें. तेव्हां मोठ्या उत्साहाने व धैर्याने त्याने सांगितले की, सरकारची आज्ञा होईल तर हीच कामगिरी काय, पण याहून अति बिकट अशी सरकारची कामगिरी करण्यास हा गरीब सेवक सिद्ध आहे, स्वामीचरणांच्या कृपेनें काळासही न भितां हा सेवक सरकारच्या कार्यात यश मिळवून येईल. हे उमेदीचे भाषण ऐकून महाराजांस फार संतोष झाला.नंतर लौकरच महाराजांनी बाळाजीपंतास पेशवाईची वस्त्रे देऊन मोठ्या इतमामाने १५००० फौज बरोबर देऊन त्याची दिल्लीकडे रवानगी केली. बाळाजीपंत महाराजांचा इमानी चाकर असल्यामुळे त्याने मराठ्यांच्या गादीची सेवा एकनिष्ठ. पणे केली. बाळाजीपंत दिल्लीस जाऊन पोचण्याच्या अगोदरच औरंगजेब बादशहा मरण पावला होता. बाळाजी दिल्लीस जाऊन पोचल्यावर पाहतो तो तेथे बेबंदशाही माजली आहे असे दिसून आले. यामुळे महाराजांच्या मातुश्रीची व राणीची सुटका होण्यासाठी फार प्रयास करावे लागले. बाळाजी मोठा धूर्त व रंग दिसेल तसा वागणारा असल्यामुळे राज्यकारस्थानें कशी उकलावी हे तो पूर्ण जाणत असे. त्याने