पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्या योगानें तो आपल्या वयाच्या मानाने शहाणा व युद्धकलानिपुण होत चालला. आधींच फार देखणा असून तो आपल्या भर उमेदीत येत चालल्यामुळे शाहूचे रूप अत्यंत मनोहर दिसू लागले. त्यामुळे बादशहाची व त्याच्या दरबारांतील प्रधानादि प्रमुख मुसलमान अधिकाऱ्यांची त्याजवर कृपा वाढत चालली. शाहू बराच वयांत आल्यावर त्याच्या राणीच्या व कन्येच्या विनंतीवरून बादशहाच्याच पदरच्या एका मोठ्या मराठी मानकऱ्याच्या मुलीशी शाहूचे लग्न करून दिले. अशा रीतीने सत्रा वर्षे शाहूचें दिल्लीत राहणे झाले. नंतर तो राज्य करण्यास लायक झाला असे दिसून आल्यावरून दक्षिणेत जाऊन आपल्या बापाचे राज्य करण्याची दिल्ली दरबारांतून शाहूस मोकळीक मिळाली. पण दिल्लीपदबादशहाशी कोणत्याही प्रकारे विरुद्ध न वागतां आपलें राज्य करावे, अशी अट ठेविली होती. त्याप्रमाणे शाहू भरंवशाने वागतो की नाही ही खात्री होईपर्यंत त्याची आई व बायको ह्या दोघींस 'ओलीस' ठेविल्या होत्या. अशा अटीने शाहूची दिल्लीहून सुटका झाल्यावर तो एकटाच थोड्याशा इतमामाने दक्षिणेत आला. आणि शिवाजीच्या व संभाजीच्या वेळचे जे लोक शेष राहिले होते, त्यांस अनुकूल करून घेऊन त्यांच्या साह्याने त्याने साताऱ्यास मराठ्यांची गादी स्थापन केली. अशाप्रकारे शाहूस राज्य मिळाल्यावर त्याची व्यवस्था वऔरे लावण्यास बराच काळ लागला. त्याची बायको व आई ह्या दिल्लीच्या अटकेंतून सुटल्या नव्हत्या, यामळे शाहू फार काळजी करीत असे. पण दिल्लीस जाऊन ते