पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२) तिच्या तैनातीच्या माणसांकडून त्या मायलेकरांचा संभाळ करविला. बादशहाच्या मर्जीचा कल बरा दिसतांच त्याची राणी व कन्या (बेगम) या दोघी संभाजीच्या अनाथ व दु:खसमुद्रांत पडलेल्या बायकोचे शांतवन करूं लागल्या, आणि तिच्या एकुलत्या एक मुलावर अतिशय प्रेम करून त्याचेही बहुत लाड करूं लागल्या. अशा सदयतेने त्या दीन अनाथांचा परामर्श होऊ लागल्यामुळे औरंगजेबास फार समाधान वाटे. ह्मणूनच तो शाहूवर अधिकाधिक प्रीति करून त्याचे मोठ्या प्रेमाने चोज पुरवू लागला. औरंगजेब शिवाजी महाराजांस 'चोर' ह्मणत असे. तेच नांव संभाजीचे मुलाचे असल्यामुळे औरंगजेब त्यास 'चोर' नव्हे 'साव' असें विनोदानें ह्मणे. यामुळे पुढे त्याचाच थोडा फेरफार होऊन शाहू असें नांव प्रसिद्धीस आले. येसूबाई व शाहू दिल्लीमध्ये बादशहाच्या अटकेत होती तरी त्यांजवर औरंगजेबाचा, त्याच्या राणीचा व राजकन्येचा लोभ फार जडल्यामुळे त्यांच्या सुखाची वृद्धि होत चालली. त्यांस हवी ती वस्तु मिळत असे, व इच्छेनुरूप वागण्यास प्रतिबंध नसे. बादशहाने शाहूला विद्या शिकण्याची सोय करून दिली, त्याचप्रमाणे घोड्यावर बसणे, तालीमबाजीच्या कसरती व पट्टा खेळण्यास शिकणे व धनुर्विद्या व निशाण मारणे इत्यादि अनेक प्रकारच्या युद्धकलाही शिक ण्याच्या सोई करून दिल्या. व मनास वाटेल तेव्हां शिकारीस जाण्याचीही शाहूला मोकळीक मिळाली. याप्रमाणे राजपुत्रास आवश्यक अशा सर्वप्रकारच्या विद्या व कला संपादन करण्याच्या सर्व सोई बादशहाने शाहूस करून दिल्या