पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आणि गणेशचतुर्थीच्या गणपतीच्या उत्सवाने तर त्यांच्या बिचकलेल्या मनांची वृत्ति अधिकच बळावून त्यांच्या संतापास मोठ्या जोराची भरती आली. समुद्राला अंवसेपुनवेच्या ताणास मागे पुढे मिळून पांच सहा दिवस मोठ्या जोराची भरती येते, हे समुद्रकांठी राहाणाऱ्या आबालवृद्वांस माहीत आहे. पुण्यांत समुद्र नाही ह्मणून नागझरीच्या किनाऱ्याजवळ आमच्या मुसलमान बांधवांच्या चंचल झालेल्या मनास भाद्रपद शुद्ध पौर्णिमा जवळ आल्यामुळे रागाची भरती आली. तिच्या कोपिष्ठ लाटा हिंदूंवर आपटून त्यांजवर करडीकमान धरण्याचे आमच्या मुसलमान बांधवांस स्फुरण आले. त्या आवेशांत त्यांनी हिंदूंवरच काय, पण आपल्या पायांवर देखील दगड मारून घेतले. त्यायोगाने काही लोकांस घायाळ होऊन कृतकर्माचे प्रायश्चित्त घेण्यास दवाखान्यांत जावे लागले. हे आमचे मुसलमान बांधव समजत नाहीत का? समजतात. पण उमजत नाहीत. हे त्यांचे व बिचाऱ्या हिंदु लोकांचेही मोठेच दुर्दैव आहे, असे मणावे लागते. _सध्या कोल्हापूरचे छत्रपती महाराज, दक्षिण महाराष्ट्रांतील पटवर्धन वगैरे संस्थानिक, शिंदे, होळकर, गाइकवाड, रेव्याचे राजे, काठेवाडांतील सर्व संस्थानिक व राजपुतान्यां तील सर्व हिंदु राजे व रजवाडे, ह्यांच्या रियासतींत मुसलईमान लोकांचा द्वेष न करितां त्यांस लायकीप्रमाणे लहान मोठे सर्व प्रकारचे हुद्दे मिळत आहेत, व त्या त्या हुद्यांच्या * मानाप्रमाणे मुसलमान लोकांचा हिंदु लोकांच्या बरोबरीने सन्मानही होत आहे. विशेष आनंदाच्या प्रसंगी किंवा द