पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०) सऱ्याच्या दिवशी मोठ्या वैभवानिशी शिंदेसरकारची स्वारी बाहेर निघाली झणजे खासा स्वारी हत्तीवर अंबारीत किंवा हौद्यांत बसते. त्या वेळी खाशांच्या पाठीमागे अत्यंत विश्वासूपणाने बसण्याचा मान महादजीबावांच्या वेळेपासून आमच्या मुसलमान बंधूंस मिळाला, तो अद्याप त्यांजकडे चालत आहे. त्या हुद्यास 'खवासखान' असें ह्मणतात. दुसरे अगदी ताजे व फार सुप्रसिद्ध असें उदाहरण बडोद्यांत घडलें तें सर्वश्रुतच आहे. खा. बा. काजी शेख शाबुद्दीन साहेब ह्यांचे गुण व लायकी जाणून हल्ली गादीवर असलेले गाइकवाड सयाजीराव महाराज यांनी काजी साहेबांस आपल्या मुख्य दिवाणगिरीची जागा दिली. तें काम काजी साहेबांनी सात आठ वर्षे अत्युत्तम रीतीने चालवून बडोद्याच्या राज्यांत मोठी वाहावा मिळविली. गाइकवाड सरकार हिंदु असून त्यांच्या मनांत मुसलमानांचा द्वेष असता तर ते आपल्या राज्यांतील सर्वांत श्रेष्ठ, मोठ्या विश्वासाची, पुष्कळ पगाराची, व परमसन्मानाची, अशी दिवाणगिरीची जागा मुसलमान गृहस्थास देते का ? ह्या प्रश्नाचे उत्तर आमच्या मुसलमान बंधूंनी निःपक्षपाताने द्यावे. झणजे हिंदु लोक मुसलमानांचे वैरी आहेत किंवा खरे हितचिंतक आहेत हे त्यांच्याच तोंडाने ठरेल. परमेश्वरकृपेनें काजी साहेब हयात असून ते पुण्यास किंवा मुंबईस असतात. त्यांजकडे आमच्या मुसलमान बांधवांनी जाऊन विचारावें झणजे बडोद्यास व इतर ठिकाणी काजी साहेबांशी व दुसऱ्या मुसलमान बंधूंशी हिंदु लोक द्वेषाने वागले किंवा मित्रत्वाने वागले हे स्पष्ट कळून येईल, मग त्यांची खातरी होण्यास उशीर लागणार नाही.