पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाडा बांधला त्याच वेळी 'राजेबागसर' या नावाने पिराची स्थापना करून दर्गाही बांधला आहे असे दिसून येईल त्या पिरापुढे रास्त्यांच्या वाड्यांतून दररोज चिराखबत्ती अद्याप लागत आहे. तसेच रास्त्यांचे वाड्यावरून गोसावीपुयाकडे सडक वळते त्या कोपऱ्यावर वाड्यास लागूनच मुसलमानी धर्माचा एक दर्गा आहे. ती जागा रास्त्यांची असून त्यांत निमाज पढण्याच्या वेळी हातपाय धुण्याकरितां मुसलमान लोकांस पाणी लागतें तें मिळावे ह्मणून रास्त्यांनीच दग्यात विहीर बांधून दिली आहे. याप्रमाणे पुण्यात व इतर अनेक ठिकाणी हिंदु लोक मुसलमानी धर्माचा पूर्वीपासून सन्मान राखीत होते व अद्यापही राखीत आहेत असे शोधून पाहणाऱ्या मुसलमान बांधवांस दिसून येईल. । बाहेरठिकाणी वेडेपणाने हिंदु लोकांशी तंटेबखेडे करण्याची आग पेढू लागली, तरी पुण्याच्या शहाण्या व हिताहित जाणणाऱ्या दूरदृष्टि मुसलमान बांधवांनी आपले चित्त व्यग्र न होऊ देतां स्वस्थ ठेवले होते. पण शके १८१६ तल्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी ज्ञानोबाची आळंदीहून, व तुकारामबावाची देहूहून, अशा दोन्ही पालख्या सालाबादप्रमाणे पंढरपुरास जातांना पुण्यांत मुक्कामास आल्या. आणि दरसाल ज्या रस्त्याने जेथें उतरण्यास जाण्याचा नियम आहे तेथे जात असतां त्या वेळी पुण्यांत कली, भूत किंवा पिशाच्य एकदम उद्भवून त्याने आमच्या प्रियकर मुसलमान बांधवांस घेरले. तेव्हांपासून त्यांची मने बिचकली. त्यानंतर नागपंचमीच्या दिवशी मातीच्या भव्य नागोबाला पाहून ती अधिकच भडकली.