पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तोच मुलूख पुढे त्यांस देऊन होळकर सरकारांनी त्यांस आपले मांडलिक केले. ते संस्थान १८५८ इ. सालापर्यंत होळकरांच्या मांडलिकांपैकी एक होते. पण त्यानंतर इंग्रज सरकाराने त्यास स्वतंत्र बनवून ते एजन्ट गवरनर जनरल सेन्ट्रल इंडिया यांच्या ताब्यात दिले आहे. हल्ली त्या संस्थानच्या गादीवर जे पुरुष आहेत ते तरुण असून फार हुशार व हिंदु जातीवर फार प्रेम करणारे आहेत असें कळते. पुणे शहर ज्या ठिकाणी वसले आहे, तेथे पूर्वी जंगल होते, ते पहिले बाजीराव पेशवे यांनी तोडून जागा साफ केली, आणि त्या ठिकाणी पुणे शहर वसविले. आज पुणे शहरांत मुसलमानी धर्माच्या अनेक मशिदी उभ्या दिसत आहेत, त्या, पेशवे सरकारच्या मनांत मुसलमानी देवस्थानांचा व मुसलमान बांधवांचा द्वेषभाव असता तर उभ्या राहिल्या असत्या का ? व त्यानंतर दुसऱ्या पेशव्यांच्या कारकीर्दीत सुद्धां मुसलमानी धर्माची अनेक देवस्थाने स्थापन झाली, त्यांच्या खर्चास नेमणुकी करून देण्यांत आल्या, (त्यांपैकी अद्याप पुष्कळ चालू आहेत.) त्या तरी मिळाल्या असत्या का ? ह्याचा प्रियकर मुसलमान बांधवांनीच विचार करावा. पुण्यांत गणपतीबद्दल मेळा निघाला त्याच्यापुढील मंजुळ वाद्यांनी पुण्यातील नागझरीवरील दारूवात्याच्या पुलाजवळच्या मशिदीतल्या व जवळपासच्या ज्या मुसलमानी धर्मभक्तांस संताप येऊन मारामारी करण्याचा आवेश आला, त्यांनी आपल्या शेजारच्या न्याहालपेठेतील रास्त्यांच्या वाड्यांत जाऊन पाठीमागच्या बागेत पहावें ह्मणजे तेथे कै. आनंदराव दादासाहेब रास्ते यांनी शंभर वर्षांपूर्वी