पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वगैरे गरीब हिंदु लोकांस इनामगांव, इनामजमिनी, व वर्षासने करून दिलेली अद्याप चालू आहेत. सध्या निजाम सरकारच्या राज्यांत मामलेदार, कलेक्टर, कमिशनर, जमीनमोजणीकडील सुप्रिन्टेन्डेन्ट, व करोडगिरीकडील वरिष्ठ अधिकारी, हे व दफ्तरदार इत्यादी अनेक खात्यांवर मोठाले हुद्देदार बहुतेक हिंदुच असतात. यावरून, शहाणे मुसलमान लोक हिंदूंचा द्वेष किंवा त्यांच्याशी वैरभाव न धरितां सलोख्याने व बंधुप्रीतीने वागतात, हे चांगले सिद्ध होत आहे. प्राचीन मराठ्यांच्या राजकारकीर्दीत व पेशवाईत देखील मुसलमान बांधवांशी हिंदु लोकांचा द्वेष किंवा विरोध नव्हता. इभ्राहीमखान गारदी हे मुसलमानधर्मी असून पेशवेसरकारचे पदरी शिंदेहोळकरांच्या बरोबरीचे फौजबंद सरदार होते. त्यांजकडे सरंजामी मुलूखही मोठा होता. त्यांचे वंशज हल्ली पुण्यांत नवाब अलिमर्दानखान साहेब आहेत त्यांस विचारावें, मणजे खात्री होईल. वायव्यप्रांतांत बांद्याचे नबाब हे मुसलमान असून त्यांजकडे पुष्कळ मुलूख देऊन पहिले बाजीराव पेशवे यांनी त्यांची स्थापना केली. तें संस्थान लार्ड डालहौसी साहेबांच्या कारकीर्दीप. यंत त्यांच्या वंशजांकडे चालत होते. जावरा हे मुसलमानी संस्थान राजपुताना–माळवा रेलवे लायनीवर रतलामच्या जवळ आहे. तें होळकर सरकारांनी स्थापन केले. जावरा संस्थानचे पूर्वज होळकर सरकारच्या पदरी स्वारांवरील रिसालदार होते. त्यांच्या ताब्यांतील सैन्याच्या खर्चास अकरा लक्षांचा मुलूख होळकर सरकारांनी नेमून दिला होता. १ जकातीचे खातें.