पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खवितील त्यांनी पाहिजे तें वाजवी का.. सुचविलें असतां, यत्किंचित् अनमान न कार करतील. मुंबई इलाख्यांतील सर्व सरकारी कामदारा. 'सुस्वभाव धारण करून रयतेशी गोडीगुलाबीचे वर्तन सुरू केल्यास त्यांचे हातून ह्या हिंदु व मुसलमानांच्या तंट्याचा आपसांतल्या आपसांत लौकर समारोप होईल, इतकेच नाही. त्यांस दुसरी कितीही बिकट कामे करण्याची सूचना केली तरी हयगय न करितां ते राजीखुषीने करतील यांत संशय नाही. लार्ड रिपन साहेबांचे लोक किती आज्ञांकित झाले होते, व ते स्वदेशी परत गेले तेव्हां त्यांचा लोकांनी केवढा मोठा गौरव केला हे आमचे सूज्ञ सरकारी अधिकारी मनांत आणून त्या धोरणाने वागतील तर रयत लोक आनंदांत राहून सरकारी अधिकाऱ्यांचे दास बनतील. हे सर्व ध्यानांत धरून योग्य वाटेल तसे करावें ही प्रार्थना आहे.. आतां अखेरीस आमच्या सूज्ञ हिंदु व मुसलम बांधवांस करद्वय जोडून प्रार्थना करतों की, इतका वे मी आपणास में काय सांगितले, ते आपण जाणत नाह. ह्मणून सांगितले असा अर्थ नाही. आपण मजपेक्षा सर्व प्रकारें श्रेष्ठ व मला परम मान्य आहां, मी आपला अत्यंत गरीब व अज्ञान किंकर असतां आपल्यांस इतकें सुचविण्याचे धारिष्ट करण्याचे प्रयोजन एवढेच की, हिंदु अथवा मुसलमान यांतून एकाकडून जरी कांही कुरापत उकरली जाऊन त्याची घासाघीस होतां होतां अखेरीस तंट्यावर व मारापिटीवर मजल जाते, त्या वेळी हिंदूंनी मुसलमानांस मारले, किंवा मुसलमानांनी हिंदूंस बडविले, तरी तो गुन्हा मानला जाऊन आंत सरकारी अधिकाऱ्यांचा हात