पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२२ । इठिकाणी सोई झालर काय? लोकांत असा बखेडा माजला काकाम वाढते, आणि त्यांची पोळी पिकते. मग अमितानं मरोत, किंवा हिंदु फांशी जावोत, त्याबद्दल आमच्या पोलिसास किंवा इतर सरकारी अधिकाऱ्यांस सुतक येत नाहींच, पण त्यांनी आरोपींस पकडून त्यांजवर गुन्ह्याची शाबिदी करून दिली झणजे त्यांना शाबासकी मिळून त्यांची जास्त बढतीही होते. "दोघांचे भांडण तेथें तिसऱ्यास लाभ" ह्मणतात तो हाच. ह्या तंट्याच्या पायीं तुमची डोकी फुटतात, हातपाय मोडतात, तुझांस बैंच पकड करून पोलीस ओढून नेऊन अब्रू घेतात; आणि शेवटी न्यायाधीश तुझांस द्रव्यदंडाच्या किंवा कैदेच्या शिक्षा देतात. इतके हाल व धिंडवडे सोसून तुह्मी मोकळे झालां तरी तुझी 'बदमाष' असा तुमच्या कपाळावर जो छाप बसनो, तो जन्मभर कायमच राहतो. माझ्या देशबांधवांची "किी दुर्दशा होते हे पाहून मला अत्यंत दुःख वाटत आहे. गोष्टीची मनांत चिंता उद्भवून ती नेहमी जागत बसली जाहे. त्यामुळे खाल्लेले अन्न गोड लागत नाही, व पडून राहिले तरी स्वस्थ झोप येत नाही. हिंदु व मुसलमान बांधवांचे आपसांतले तंटे व त्यांचे दुःखकारक परिणाम हेच मनांत निरंतर घोळत आहेत. अशी माझी स्थिति झाल्यामुळे आपणांस अल्पबुद्धिनें विनंती करावी असें मनांत आल्यावरून हे दोन शब्द आपणापुढे ठेविले आहेत, तर ह्याचा नीट विचार करण्याची तुह्मांस परमेश्वर बुद्धि देवो, अशी त्याची प्रार्थना करून व ह्या लेखांत अज्ञानानें कोठें कांहीं प्रमाद झाला असल्यास त्याची क्षमा करण्याबद्दल सर्वांस विनंती करून आपली रजा घेतों.