पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२२ ) ठिकाणी सोई झाल्या आहेत. तात्पर्य कोणताही उद्योग नेट धरून एकाग्रतेने केला असता त्यांत परमेश्वर यश देतो, आणि उडाणटप्पुपणा केल्यास समुद्रांत गेला तरी कोरडा ठणठणीतच राहतो. हे मुख्य तत्व ध्यानात धरून सर्वांनी आपआपल्या शक्तीप्रमाणे गोड वाटेल त्या उद्योगास लागावें. ह्मणजे संसाराचा गुजारा चांगला चालेल. आतां आमच्या दयाळू इंग्रज सरकारास व त्याच्या लहान मोठ्या सर्व अधिकाऱ्यांस प्रार्थना आहे की, ईश्वरसत्तेने आमच्या देशाचे राज्य तुमच्या हाती आले आहे, व प्रजापालन करून लोकांस सुखी ठेवण्याचेही तुझी ब्रीद बाळगीत आहां. त्या अर्थी विद्यार्थ्यांस धाकदरारा दाखविण्याकरितां शहाणा मास्तर आपल्या हाती छडी घेतो, पण तिने तो विद्यार्थ्यास सहसा झोडपीत नाही. छडी मारून केलेला बोध विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनांवर ठरत नाही. युक्तीने गोंजारून ममतेने केलेला बोध विद्यार्थ्यांच्या मनावर चांगला ठसून बसतो. शिवाय असल्या सौम्य उपचारांनी विद्यार्थी नत्रासतां खुष राहतात. ह्मणून त्यांचा असल्या सूज्ञ मास्तरावर भरंवसा राहून प्रेम वाढते. सरकारी अधिकाऱ्यांचे हाती कायद्याची छडी दिली आहे, तिनें उठल्या बसल्या गरीब रयतेच्या पाठी फोडायच्या असा उद्देश नाही. ते आयुध फक्त धाक दाखविण्यापुरतेच आहे असे समजायचे. सरकारी कामगारांनी रयतेशी जें वर्तन ठेवावयाचे तें शुद्ध ममतेचें-आपण आपल्या पुत्राशी जे प्रेम ठेवितो त्याचप्रकारचे अकृत्रिम असले पाहिजे. तरच अज्ञान व गरीब प्रजा संतुष्ट राहील. आणि ती सरकारी कामगारांशी मोठ्या नेकीने वागून त्यांच्या अर्ध्या वचनांत राहील. अशा प्रकारचे जे सरकारी कामगार रयतेशी सरळपणा व उदारभाव दा