पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२१) तुझी सध्यां किती पराधीन झालां आहांत हे मनांत आणा. वास्तविक अशी स्थिति प्राप्त झालेली. तुझी सर्व जाणत व अनुभवीत असतां हूडपणानें आपसांत लठ्ठालठ्ठी करून झोटिंगबादशाही माजवू पहाल तर त्या योगानें सरकारचे कांहींच वांकडे न होतां तुमचा मात्र सत्यानाश होईल हे पकें ध्यानांत धरून ठेवा. परमेश्वराच्या कृपेनें आज आपल्या देशांत इंग्रजी राजसत्तेच्या योगानें जिकडे तिकडे शांतता झाली आहे. हवा तो उद्योग करण्याची कोणास मनाई नसून त्याच्या अनुकूल. तेच्या अनेक सोई वाढल्या आहेत. यामुळे आज उद्योगयुगच प्राप्त झाले आहे. अशा समजुतीने वागून त्याचा अनेक प्रकारे काही लोक चांगल्या रीतीनें उपयोग करून घेत आहेत. अशी सोन्यासारखी वेळ प्राप्त झाली असतां आपण भलत्याच छंदांत न पडतां योग्य उद्योगाच्या पाठीस लागावें हेंच नीट आहे. तुह्मी आपल्या आवडीप्रमाणे हवा तो धंदा केला तरी कोणाची मनाई नाही. शेतकी करणे असेल तर शिंदे व होळकरांच्या राज्यांत, रेवा संस्थानांत नागपूर इलाख्यांतील चांदा, बालेघाट, मंडला व सिवनीछपारा इ० खालसा अमलांत, व छत्तिसगड डिव्हिजनांतील बस्तर, कांकेर, व कालाहंडी इ० सर्व संस्थानिकांच्या राज्यांत व जमीदार लोकांच्याही मुलखांत लक्षावधि एकर जमीन उत्तम पिकाऊ असतां लागण करण्यास माणसें नाहीत ह्मणून पडीत पडली आहे. तेथें साराही फार अल्प ह्मणजे दर एकरास चार आण्यांपासून तो पराकाष्ठा दीड रुपयापर्यंत पडत आहे. तिकडे जावें. क्रय-विक्रयाचा उद्योग व कारागिरी काम करणे असेल तर त्याच्याही सर्व ११