पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२० ) देईल. तुझी मोठे कर्मनिष्ठ, स्वधर्मपालक, व निःसीम भक्तिमान आहांत, हे दाखविण्याकरितां एकमेकांत भांडून मारामाऱ्याच करावयाला पाहिजेत असे नाही. तो प्रकार तुमच्या नेहमींच्या आचरणावरून लोक चांगला जाणत आहेत. याकरितां असला हा द्राविडी प्राणायाम करण्याचा प्रयास कोणीच करूं नये. हिंदूंस व मुसलमानांसही स्थाईक 'उत्पन्नें राहिली नसल्यामुळे दिनचर्येचा खर्च कसा भागवितां येईल, ह्या फिकिरींत आपण सर्व पडलों आहों. पोरेंबाळे भुकेने व्याकुळ होऊन रडतांना पाहिली किंवा उपाशी आहेत असे ऐकिलें ह्मणजे आपला जीव तिळतिळ तुटतो. अशा संकटाच्या वेळी आपले उद्योगधंदे सोडून आपसांतील तंटे भांडत बसलों तर पुढे आपला व आपल्या कुटुंबांतील माणसांचा किती उन्हाळा होईल, ह्याचा स्वस्थ चित्ताने विचार करा, ह्मणजे कळून येईल. तुमच्यासारख्या शहाण्या लोकांस याहून अधिक सांगण्याची जरूर नाही. कारण ते सर्व तुह्मी जाणतच आहां. यास्तव आतां थंड व्हा, वृथाभिमान सोडा, कोणी तुमच्या हिताची गोष्ट सांगितली असतां तिचा अव्हेर न करितां स्वीकार करून त्याप्रमाणे वागण्याचा दृढनिश्चय करा. इंग्रज सरकार मोठे बलाढ्य असून फार शहाणे व चतुर आहे. यामुळे तुमची अकल किती, तुमच्यांत एकोपा किती, तुमच्यांत धाडस व शौर्य किती आणि तुमची शक्ति व एखाद्या कामाचा सतत पाठलाग करण्याचा दृढनिश्चय किती हे सर्व ते जाणून आहे. त्यांनी आपल्या अकलेच्या जोराने तुह्मांस मागेंच जिंकलें आहे, आणि आतां तर तुमच्या केसा केसाला गांठी देऊन तुझांस अगदीं जखडून टाकिलें आहे, तेणेकरून