पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११९) करितां परस्परांत तंटे होण्याची कारणे काय ही प्रथम समजून घ्यावी. आणि मग पुनः अशा कटकटी परस्परांत न होण्याकरिता काय उपाय योजावे, ह्याचा शांतपणे विचार करावा. ह्या चौकशीच्या व विचाराच्या वेळी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या कोणी काढू नये. सर्वांनी शांतवृत्ति धारण करून कोणाचा पक्षपात न करता केवळ न्यायबुद्धीने हे कार्य करावें, मणजे या कामांत सभेस खचित यश येईल. पुण्यातल्या हिंदु मुसलमानांतले तंटे मिटविण्याविषयी परिश्रम करून पुणे सार्वजनिक सभेनें तें यश संपादन केल्यास तिची सर्व लोकांत व सरकारांतही मोठी कीर्ति वाढेल. व तिनविषयी सर्व लोकांमध्ये मोठी वाहवा होईल. व तिच्या कृतीविषयी लोक जास्त रोम दाखवतील. यास्तव इतर कामें जरा बाजूस ठेवून सभेने हे काम अगोदर अगत्यपूर्वक करावे अशी प्रार्थना आहे. शेवटी आमच्या हिंदु व मुसलमान बांधवांस हात जोडून अति विनयाने प्रार्थना करितों की, जेव्हां खरें शौर्य दाखवून पराक्रमाने आपले रक्षण करण्याचा प्रसंग होता त्यावेळी तुझी मेंढ्या बनलां, आणि आतां घरांत चुलीजवळ बसून बायकोस कोरडा दरारा व शौर्य दाखविण्याकरितां जसा पट्टा खेळावयाचा तशाप्रकारची कृत्ये आवेशाने करूं लागला हे शहाणपण कुठले ? प्रसंग पाहून त्या काळास उचित असेल तसेंच माणसाने वर्तन केले तर त्याला सुख होते. आणि तसे न करितां अनुचित कर्म आचरण केल्यास त्याला दुःखाच्या व विपत्तीच्या डोहांत पडावे लागते, हे न विसरतां पक्कें ध्यानांत धरा. आज तुमची धर्मावर श्रद्धा व भक्ति किती आहे, तुह्मी आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे निष्ठापूर्वक किती वर्तन करितां, ह्याची साक्ष तुमचे मनच तुझांस ..