पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११८ ) साली दक्षिणेत पडलेल्या दुष्काळाच्या प्रसंगी ह्या सभेनें फार परिश्रम करून लोकांस मदत करण्याचे फार मोठे काम केले आहे. यावरून ही सभा लोकांच्या अनेक प्रकारे कल्याणाच्या कामी झटण्यास सिद्ध आहे, असें ठरते. यास्तव आपसांतील भांडणाने प्रत्यक्ष पुण्यातील लोकांस जी पीडा होऊन गैरसोय व हानि होत आहे, तिचेही निवारण करण्याचे उपाय सभेने मनापासून करावे, हे तिचे कर्तव्यच आहे. ह्मणून सभेच्या आरंभापासून अनुभवलेल्या, पोक्त व दयाळू सेक्रेटरीसाहेबांस, व अरमन रा. ब. अण्णासाहेब विष्णु मोरेश्वर भिडे यांस आणि नवीन विद्वान, ताज्या दमाचे, व सूज्ञ जाइंट सेक्रेटरीसाहेबांस हात जोडून विनंती आहे की, आपण पुणे शहरांतील अब्रूदार, लोकमान्य व शहाण्या अशा थोर व प्रमुख गृहस्थांची कमिटी नेमावी. तिजमध्ये आजवर पुण्यांत झालेल्या तंट्याशी ज्यांचा बिलकुल संबंध नसून ज्यांना हिंदु मुसलमानांचे तंटे मिटावे आणि उभयपक्षांचे सख्य व्हावे अशी मनापासून इच्छा असेल अशा प्रकारचेच लोक त्या कमिटींत घ्यावे. त्यांत कांहीं पारशी, यहुदी व साधल्यास युरोपियन गृहस्थ असावे. शिवाय काहीं गुजराथी, कापडगंजांतले मारवाडी, बुधवार पेठेतले कापडवाले शिंपी, भांडेआळीतले कांहीं कांसार, कांहीं मोमीन व कांहीं बोहरी इत्यादि मंडळी त्या कमिटींत योजावी. त्यांच्या बैठका बसतील त्यांत मुसलमानांपैकी नवाब अलिमर्दाखान साहेब, व त्यांच्याचसारखे पोक्त पोक्त असे दुसरे कांहीं काजी व मौलवीही बोलवावे. जमल्यास व योग्य वाटल्यास पोलिस इनस्पेक्टर साहेबांसही निमंत्रण करावें. आणि तंट्याच्या प्रसंगी रागाच्या तावांत होऊन गेलेल्या गोष्टीचा फारसा विचार व खल न