पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सध्या ह्या हिंदुस्थान देशांत सर्वांत श्रेष्ठ असें संस्थान हैदराबादच्या निजाम सरकारचे आहे. तें राज्य मुसलमान धर्मबांधवांकडे असून तेथे पूर्वीपासून हिंदु लोकांस मोठाले हुद्दे मिळत असत, व अद्यापही मिळत आहेत. पूर्वी कोणीएक मध्व वीरवैष्णव ब्राह्मण, चंदूलाल हे कायस्थ हिंदु, व विठ्ठल सुंदर या नांवाचे इलिचपूर येथील राहणारे यजुर्वेदी ब्राह्मण, हे सर्व अनुक्रमें निजाम सरकारचे दिवाण होते. पूर्वी पेशवाईत साडेतीन शहाणे ह्मणून जे प्रसिद्ध असत त्यांपैकी विठ्ठल सुंदर हे एक पुरुष होत. संख्या, देवा, विठ्ठला, ही ह्मण प्रसिद्धच आहे. ह्मणजे, हे तिघे एकेक शहाणे, आणि अर्धा शहाणा नानाफडणवीस. व्यंकण्णा व मादण्णा जात ब्राह्मण, व राय रायबहादुर जात ब्राह्मण हे अनुक्रमें निजाम सरकारच्या राज्यांत जमाबंदी खात्यावरील प्रमुख (दफ्तरदार) होते. ह्या सर्व लोकांस मोठाल्या नक्त नेमणुका व लक्षावधि रुपयांचे मुलूख दिले होते ते अद्याप त्यांच्या वंशजांकडे चालले आहेत. निजाम सरकारच्या राज्यांतील शेतकरी व व्यापारी वगैरे, बहुतेक हिंदुधर्मी असून त्यांजवर कोणत्याही प्रकारे जुलूमजबरी होत नाही. हिंदूंच्या देवस्थानखर्चास नक्त नेमणुका, व ब्राह्मण १ सखाराम बापू बोकील देशस्थ ब्राह्मण मौजे हिवरें ता० पुरंदर जिल्हा पुणे येथील कुळकरणी असून पेशव्यांचा कारभारी होता. २ देवाजीपंत चोरघडे यजुर्वेदी ब्राह्मण हा नागपूरकर भोंसल्यांकडून पुण्यांत पेशव्यांकडे वकील असे. ३ विठ्ठल सुंदर हे यजुर्वेदी ब्राह्मण निजामाचे दिवाण होते. ४ बाळाजी जनार्दन भानु हा कोंकणस्थ ब्राह्मण पेशव्यांचा फडणवीस व कारभारी होता.