पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

F E to the Te to go to i Nr-- (१०८) करून स्वस्थ बसते असे नाही. प्रसंगोपात्त लोकांवर खासगी रीतीची संकट येऊन ते अडचणींत पडले तर ती निवारण करण्याचा ही सभा यथाशक्ति प्रयत्न करते. सन १८७२ साली खानदेशांत अतिशय पर्जन्यवृष्टि होऊन गिरणा नदीस मोठा पूर आला. त्या योगाने नदीकिनाऱ्याचे बहुत गांव व जमिनी वगैरे वाहून गेल्यामुळे खानदेशांतील लोकांचे अतिशय नुकसान होऊन ते महत्संकटांत पडले. हे ऐकतांच पुणे सार्वजनिक सभेने मोठी जाहीरसभा भरवून त्या लोकांच्या साह्यार्थ वर्गणी जमविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यास बरेंच यश येऊन एकंदर चार पांच हजार रुपये जमा झाले. ते खानदेशच्या कलेक्टर साहेबांच्या मार्फत शे. तकरी लोकांस देण्यांत आले. दक्षिणेतील काही जिल्ह्यांत मारवाडी वगैरे सावकार लोकांच्या कर्जामुळे शेतकरी लोक फार नाडले गेले, सबब त्यांच्या बचावाचा काही तरी उपाय योजावा, ह्मणून पुणे पार्वजनिक सभेचे मूळ उत्पादक, कैलासवासी रावबहादुर सदाशिव बल्लाळ गोवंड्ये व गणेश वासुदेव जोशी, ( सार्वजनिक काका) हे मुद्दाम कलकत्त्यास जाऊन आनरेबल होप साहेब त्या वेळी हिंदुस्थानसरकारचे एक कौन्सिलदार होते, त्यांस भेटले. आणि दक्षिणेतील गरीब शेतकयांची विपन्न स्थिति त्यांस कळविली, त्यावरून सन १८७९ साली शेतकऱ्यांचे संबंधाचा निराळा कायदा होऊन तो पुणे, सातारा, अहमदनगर, व सोलापूर ह्या चार जिल्ह्यांस लागू केला. काकांच्याच प्रयत्नाने पुण्यास व इतर ठिकाणी लवादकोटें स्थापन झाली, तें काम पुण्यांत उत्तम