पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १०७ ) नेमणुका झाल्या, त्यांपैकी तीन मोठ्या हुद्याचे, पोक्त असे युरोपियन होते, व ३ श्रेष्ठ असे नेटिव गृहस्थ होते, त्यांची नांवें-जयाजीराव शिंदे अलिजाबहादर, जयपूर संस्थानचे महाराज, व राजा सर दिनकरराव राजवाडे. याप्रमाणे एकंदर सहा असामींचे कमिशन बसून चौकशी झाली. यावरून प्रसंगी पुण्यातील हिंदु आणि मुसलमान एकमताने वागून देशहिताची कामें करितात, असे दिसून येईल. दक्षिणेतील लोकांमध्ये ऐक्यभाव वाढून लोकहिताची कामें यथाकाली करता यावी याच उद्देशाने 'पुणे सार्वजनिक सभा' स्थापन करण्यांत आली आहे. तिचे सर्व सभासद लोकांनी निवडून दिलेले आहेत. त्यांत हिंदु, मुसलमान, पारशी, यहुदी व युरोपियन इत्यादि सर्व जातींचे अनेक धंद्यांचे व निरनिराळया धर्माचे असे लोक आहेत. त्या सभेच्या द्वारे अनेक चांगली कामें होतात. __ मुंबईसरकारांत किंवा हिंदुस्थानसरकारांत नवे कायदेकानू अगर ठराव होऊ लागले ह्मणजे त्याबद्दल कायद्याचे मसुदे सरकारी ग्याझिटांत छापून प्रसिद्ध झाले झणजे सभा त्यांचे बारीक रीतीने परिक्षण करिते, आणि त्यांत जे दोष दिसतील ते काढून टाकण्याबद्दल सरकारास विनंती करते. त्यायोगाने लोकांचे मणणे काय आहे, व त्यांस कायकाय अडचणी येण्याचा संभव आहे ते लोकांस व सरकारास स्पष्ट कळू लागते. ह्या पुणे सार्वजनिक सभेपासून लोकांस व सरकारास नेहमी हारे । लाभ होत असतो. अशा रीतीने सरकारास मदत करण्याचा क्रम सभेच्या हातून नेहमी चालू राहिला आहे. ही सभा केवळ राजकीय संबंधाच्याच विषयाची चर्चा