पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०९) प्रकारे चालले आहे. स्थानिक स्वराज्याबद्दल लोकांस जास्त अधिकार देऊन लोकलफंड व मुनिसिपालिट्यांचे सभासद निवडण्याचा अधिकार लोकांस देण्याचे लार्ड रिपनसाहेब गव्हर्नर जनरल यांनी मनांत आणून तारीख १८ मे सन १८८२ रोजी एक ठराव इंडियाच्या सरकारी ग्याझिटांत प्रसिद्ध केला. ती गोष्ट इलाख्यांच्या सरकारांस मान्य होईना, ह्मणून पुणे सार्वजनिक सभेने आपल्या पदरचे हजारों रुपये खर्चुन मुंबई इलाख्यांतील कर्नाटक, गुजराथ व महाराष्ट्र ह्या तिन्ही भागांतील १८ जिल्ह्यांत आपले एजंट पाठविले. आणि हा नवीन हाती येणारा अधिकार लोकांच्या हातांत कायम राहण्याकरितां काय केले पाहिजे, व कशा रीतीनें हुशारी धरून वागले पाहिजे, हे तेथल्या लोकांस समजून देण्याकरितां मोठाल्या शहरी व तालुक्याच्या व मुनिसिपालिट्यांच्या गांवीं पुष्कळ लोकांची सभा भरवून सभेच्या एजंटांनी सविस्तर माहितीने भरलेली अशी भाषणे केली. त्या योगाने लोकांस हा विषय बराच समजू लागला, व नवीन व्यवस्थेच्या संबंधाने १८८४ साली जे कायदे झाले, त्यांची अमलबजावणी होतांना सभेच्या उद्योगाचा लोकांस फार उपयोग झाला. ह्या वाटाघाटीचा सर्व योग कै० सिताराम हरि चिपळूणकर त्या वेळचे पुणे सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी ह्यांनी जमवून आणिला. चिपळूणकर हे मोठे शहाणे व मुत्सदी होते. त्यांनी त्या वेळी मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फm. सनसाहेब व त्यानंतर लार्ड रेसाहेब, कौन्सिलदार पील साहेब, व सेक्रेटरी न्यूजंटसाहेब इत्यादि थोरथोर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्नेह संपादन केल्यामुळे त्यांच्या अनेक वेळ १०