पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०६ ) एकदम धरून तोफेच्या तोंडी देऊन उडवितां आलें असतें. - पण त्या वेळच्या थोर अधिकाऱ्यांनी रयत लोकांचा बिलकुल छळ केला नाही. ते कामगार मागेच निघून गेले. पण त्यांची सुकीर्ति अद्याप जिवंत आहे. असो. पुण्यांतले हिंदु व मुसलमान लोक एकजुटीने वागल्याचे एक ठळक उदाहरण आहे ते पहा. बडोद्याचे मल्हारराव गायकवाड यांजवर विषप्रयोग केल्याचा आरोप आल्यावरून त्यांस कैद केले. आणि त्यांची कमिशनमार्फत चौकशी करण्याचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल लार्ड नार्थ ब्रुक साहेब यांनी ठरविलें. ही खबर ऐकतांच पुण्याच्या लोकांनी फार त्वरा करून मोठी जाहीरसभा भरविली. त्या सभेचे अध्यक्ष नबाब अलिमर्दाखान साहेब होते. त्या सभेत पुष्कळ भाषणे होऊन शेवटी असे ठरले की, मल्हाररावांची चौकशी नुसत्या युरोपियन लोकांपुढे न होतां त्या कमिशनांत मल्हाररावांच्या बरोबरीचे असे थोर थोर नेटिव गृहस्थ असावे. व त्या कमिशनांतील नेटिव आणि युरोपियन यांची संख्या समसमान असावी. शिवाय मल्हाररावसाहेब पुष्कळ वर्षे कारागृहांत असून तेथून जे सुटले ते राज्यावरच बसले यामुळे त्यांना राज्यकारभार करण्याचे शिक्षण अगदीच मिळाले नाही. ह्मणून सरकाराने त्यांजवर मेहरनजर ठेवावी. अशा प्रकारचे सभेत ठराव होऊन तशा मजकुराचा एक मोठा अर्ज तयार केला होता, त्याजवर अध्यक्ष या नात्याने नबाबसाहेबांची सही घेऊन तो अर्ज हिंदुस्थानसरकाराकडे लागलीच रवाना करण्यांत आला. त्याचा योग्य विचार होऊन सभेच्या सूचनेप्रमाणे सर्व व्यवस्था करण्यांत आली. कमिशनामध्ये एकंदर ६ गृहस्थांच्या