पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लाही बिकट प्रसंग आला तरी न घाबरतां योग्य कामांत धैर्याने पुढे पाऊल टाकणारे व जातीने द्रव्याची, अकलेची व श्रमांची घस सोसून परोपकार करणारे असे बहुगुणसंपन्न आहेत, अशी बहुत कालापासून कीर्ति गाजत आहे, ती आतां नुसती नामशेष होऊन राहिली आहे असे नाही. त्याबद्दल मा. गचे दाखले तर पुष्कळच दाखवितां येतील, पण आज तशा प्रकारच्या गुणांनी अनेक कृति मूर्तिमंत चालल्या आहेत त्याचें प्रत्यक्षप्रमाण दाखवितों, झणजे वाचणाऱ्यांची खात्री होईल. सन १८५७ सालीं उत्तरहिंदुस्थानांत शिपायांनी केलेल्या बंडाची धामधूम माजली, तेव्हां पुणे शहराबद्दल बाहेरगांवच्या लोकांस फार भीति वाटत होती. पण पुण्याच्या राजनिष्ठ लोकांनी आपल्या चित्ताची चंचळता न होऊ दिल्यामुळे काहीएक गडबड झाली नाही. त्याचप्रमाणे त्या वेळी लोकांच्या भाग्याने पुण्यास जिल्ह्याचे जे सरकारी अधिकारी होते, तेही दयाळू, चतुर व मुत्सदी होते. डंकन डेव्हिडसनसाहेब पुण्याचे कलेक्टर व डिस्ट्रिक्ट माजिस्ट्रेट होते. त्याचप्रमाणे रा०ब० नाना मोरोजी हे हुजूर डेप्युटी माजिस्ट्रेट असून त्यांजकडे पुणे शहरचे फौजदारी खटले निकालास लावण्याचा अधिकार असे. ह्या दोन्ही सुज्ञ अधिकाऱ्यांनी उगीच कोणाचा वहीम धरिला नाही. लुच्चे लोकांच्या मुठींत सांपडून आपले कान हलके होऊ दिले नाहीत. ह्मणून इतर जिल्ह्यांप्रमाणे 'साप साप ह्मणून उगीच्या उगीच जमीन धोपटली गेली' तसा प्रकार पुण्यांत बिलकुल घडला नाही. हलक्या कानाचे व छांदिष्ट किंवा खुनशी कामगार त्या वेळी पुण्यांत असते तर मनास येईल त्या लहान मोठ्या लोकांस