पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०४ ) त्यात नये आहे पक्ष परस्प लेला यांच्या हातून ह्या उपायांची योजना होणे शक्य नाही. तसले सामोपचार परस्थांनी केले तर दोन्ही पक्षांसही मान्य होतात. साधारण व्यवहारांत देखील सर्व ठिकाणी असाच प्रकार घ. डत असतो. दोन व्यक्तींची बोलाचाली किंवा मारामारी जुं पली ह्मणजे तिसरा मनुष्य मध्ये पडून उभयतांस बोधाच्या दिवा गोष्टी समजून सांगतो, तेव्हां त्यांचा तंटा मिटून दोघेही शांत होतात. सरकारांत जे लोक फिर्यादी घेऊन जातात त्यांचा हेतु असा असतो की, दोन्ही पक्षांचे ह्मणणे तिसऱ्याने ऐकून घेऊन उभयतांस निस्पृहतेने न्यायाचा मार्ग दाखवावा, ह्या मग तत्वास अनुसरून सरकाराने व सरकारी अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांकडील शहाणे, समजूतदार, पोक्त व लोकमान्य अशा गृहस्थांच्या साह्याने खवळलेल्या हिंदु व मुसलमान लोकांचे ह्मणणे काय आहे ते नीट समजून घ्यावें, आणि मग दोन्ही पक्षांकडील प्रमुखांच्या विचाराने कोणत्या लोकांनी कसकसें वागावे ह्याबद्दल नियम ठरवावे. अशा प्रकारे सरकारी अधिकाऱ्यांसमक्ष दोन्ही पक्षांच्या समजुतीने जे नियम ठरतील ते उभयपक्षांकडील प्रमुख लोकांच्या सह्यांनिशी सरकारांत ठेवावे, आणि त्यांच्या प्रती सर्व ठिकाणच्या वर्तमानपत्रांतून छापून प्रसिद्ध कराव्या. आणि उभयपक्षांतील लोकांमध्ये फुकट चांटाव्या. अशा युक्तीच्या उपायाने हे तंटे लौकर बंद होतील अशी आशा आहे. ह्मणून आतां विलंब न लावितां सरकाराने कृपा करून एवढे पुण्य लौकर संपादावे अशी प्रार्थना आहे. पुण्यांतले हिंदु व मुसलमान लोक शहाणे, राज्यकार्यधुरंधर, प्रसंगावधानी, स्वकार्यदक्ष, उद्योगी, राजनिष्ठ, लोकया सुधारणा करण्याविषयी उत्सुक, एका जुटीने चालणारे, कस