पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०२). झाली, त्यावरून तेथे शिक्षेदाखल जादा पोलीस ठेवण्यांत आले, त्याबद्दल तीस हजार रुपये खर्च नुसत्या हिंदु लोकांकडून घेण्याचा ठराव झाला. मुंबई इलाख्यांतल्या नाशिक जिल्ह्यांतील येवलें गांवी १८९४ साली हिंदु व मुसलमानांत तंटे व मारामाऱ्या झाल्या, ह्मणून तेथेही जादा पोलीस ठेवण्यांत आले, त्याप्रीत्यर्थ सात, आठ हजार रुपये त्या गांवच्या सर्व लोकांवर कर बसविला. तात्पर्य हिंदु व मुसलमानांतील तंटे सौम्य उपायांनी बंद करण्याचा सरकाराने व सरकारी अधिकाऱ्यांनी प्रयत्न न केल्यास ही तंट्याची आग लौकर न विझतां अधिकाधिक पसरत जाईल, ही मोठी भीति आहे. आणि तसें झाले असतां नेहमीं सरकारास व लोकांस बहुत त्रास होणार आहे. ही तंट्याची आग अशीच धुमसत राहिली तर हिंदु व मुसलमानांमध्ये अधिकच वैर वाढून भलत्याच वेळेस आकसाने ते बेफाम होऊन मारपीट करतील. तेव्हां पोलिसाकडून धरपकड सुरू होऊन उभयपक्षांकडील लोक न्यायाच्या चरकांत गुंतून द्रव्यास व अब्रूस नागवले जातील, आणि मग 'मेलेल्या माणसास काठ्यांनी धोपटण्याप्रमाणे' त्या गांवावर जादा पोलीस ठेवून त्याचा खर्च लोकांकडून सरकार चोपून वसूल करील. अशा रीतीने रयत लोक नाडले गेले ह्मणजे अर्थातच ते सरकारच्या नांवानें मनांत चरफडतील, वशिव्याशापही देतील. याशिवाय एकंदर लोकांतील स्वस्थता कमी होऊन देशांतील शांतता नष्ट होऊ लागेल, हे इंग्रजी राज्याच्या स्थैर्यास व जरबेस हानिकारक आहे. सरकाराने हे सर्व ध्यानांत आणून वरील विनंतीप्रमाणे हिंदुमुसलमानांत होणारे तंटे मि