पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ण्यास संतोषाने तयार होतील हा पूर्ण भरंवसा आहे. " नखानें तोडतां येण्याऱ्या वस्तूवर मोठ्या कुन्हाडीचा जोराने घाव घालणे हा युक्तीचा व शहाणपणाचा मार्ग नव्हे" हे सर्व कबूल करतील. ह्मणून माझ्या विनंतीप्रमाणे हिंदुस्थानच्या मुख्य सरकाराने व इलाख्यांच्या सरकारांनी युक्तीच्या मार्गाने प्रयत्न सुरू केल्यास कोणाची धरपकड करण्याची, मार खाण्याची व देण्याची आणि पोलिसास अनिवार होऊन शांतता करतां येईनाशी झाली ह्मणजे लष्करी लोक व तोफखाना आणून उभा करण्याची, कधी कधीं जरूर पडते, तसला भयंकर प्रसंग कधीही येणार नाही, अशी मला खात्री आहे. ज्या गांवांत किंवा शहरांत असले तंटे होऊन जुलूमजबरी किंवा मारपीट होते, त्याबद्दल आरोपीस धरून त्यांजवर खटले करण्यांत येतात. तशा प्रसंगी कधी कधी निरपराधी व निरुपद्रवी लोकही त्यांत घुसडले जातात, असें आलीकडे सरकारच्याच न्यायाधिशांच्या लक्षात आल्यावरून, त्यांनी येवल्याचे व पुण्याचे खटले सोडून दिले. कारण तशा घालघुसडींत गरीब व निरपराधी लोकांचा न्यायाच्या चरकांत चुराडा होतो हे सरकारचे खरे न्यायाधीश समजून आहेत. पण कधी कधीं कायद्याच्या हुकुमापुढे त्यांचा निरुपाय होऊन पुराव्याच्या मानाने त्यांस कठोरपणा करावा लागतो. असल्या मारपिटीचे खटले निकालास लागले तरी तेवढ्याने लोकांची सुटका होत नाही. त्याबद्दल गांवच्या सर्व लोकांस सरसकट प्रायश्चित निराळेच भोगावे लागते. वायव्यप्रांतांतील अजीमगड जिल्ह्यांतील हिंदु व मुसलमान ह्यांच्यामध्ये सन १८९३ सालीं मारामारी