पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

FFFF व डेप्युटी कमिशनर, तसेच तालुक्याचे मामलेदार व तहशिलदार, पोलीस सुपरिंटेंडेंट, पोलीस इन्स्पेक्टर, आणि चीफ कॉन्स्टेबल वगैरे सर्व सरकारी अधिकारी हे आपापली वजने व भिडाभाडा खर्चुन दोन्ही पक्षांतील प्रमुख लोकांच्या मदतीने हे तंटे सहज मिटवून चांगले यश संपादन करितील ह्यांत संशय नाही. सध्या आपल्या हिंदुस्थान देशाचें स्वामित्व लार्ड एलगिन् साहेबांकडे आहे, त्यांची ह्या देशांतील रयतेवर मेहरनजर आहे, ह्मणूनच त्यांनी जंगलखात्या संबंधी अलीकडे जो ठराव प्रसिद्ध केला आहे, त्यांत रयत लोकांस पुष्कळ सवलती दिल्या आहेत. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशांतील जमिनीची दुसऱ्या खेपेची मोजणी होऊन दरठरोती झाली, त्यांत सरकारानें उत्पन्नापैकी दरशेकडा ६५ रुपये आपलेकडे घेऊन फक्त शेकडा ३५ रुपये मालगुजारास देण्याचे ठरविले होते, त्यांत फेरबदल करून दरशेकडा ६० रुपये सरकाराने घ्यावे, व ४० रुपये मालगुजार लोकांस द्यावे, असें लार्ड साहेबांनी ठरविले आहे. या गोष्टींवरून लार्ड एलगिन् साहेबांची रयतेवर दयादृष्टि आहे असे स्पष्ट दिसते. तेव्हां अशा थोर महात्म्या पुरुषांनी आपल्या रयतेमध्ये क्षुल्लक कारणांवरून आपसांमध्ये वारंवार तंटे होऊन मारामाऱ्या होतात, त्यायोगाने हिंदु व मुसलमान बांधवांत वैर वाढून उभयतांचाही मोठा तोटा होतो, तो टाळण्याची इच्छा धरून उभयतांचा आपसांत समेट करून देण्याचे मनांत आणिल्यास त्यांना कोणता पक्ष नाहीं ह्मणेल? दोन्ही पक्षांतील लोक लार्ड साहेबांच्या ह्मणण्यास अत्यादराने मान्य होऊन ते सांगतील त्याप्रमाणे वाग करित नबर