पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वस्ती सर्व ठिकाणी आहे, तथापि तेथील सरकारचे लहान मोठे अधिकारी लोकांजवळ ममतेने, प्रजावात्सल्याने, व फार सावधगिरीने वागत असल्यामुळे तेथें हिंदु व मुसलमानांचे तंटे आजवर कधी झाले नाहीत. तिकडील जबलपूर डिव्हिजनपैकी सागर, दमो, व जबलपूर हे जिल्हे तर वायव्यप्रांताच्या सरहद्दीस लागलेले असल्यामुळे तिकडील दांडग्या मुसलमान वस्तीच्या लोकांशी त्यांचा संबंध असून वायव्यप्रांतांतील हिंदु व मुसलमानांत होणाऱ्या दंग्यांच्या बातम्या वारंवार त्यांच्या कानावर येत असतांही, मध्यप्रदेशांतील सरकारी अधिकाऱ्यांच्या उत्तम व्यवस्थेमुळे त्यांनी तिकडे दंगा होऊ दिला नाहीं; हे तेथल्या अधिकाऱ्यांस अत्यंत भूषणास्पद आहे. आमचे मुंबई इलाख्यांत जे सरकारी अधि. कारी आहेत त्यांनी मनावर घेतल्यास हिंदु व मुसलमान लोकांत होणारे तंटे बंद करण्यास फार काळ व बहुत श्रम नकोत. तें काम हां हां ह्मणतां होण्याजोगे आहे. पहा, हिंदुस्थानच्या गव्हर्नर जनरल साहेबांनी व इलाख्याच्या गव्हनरांसारख्या श्रेष्ठ अधिकाऱ्यांनी कृपा करून हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे युक्तीने मिटवून टाकण्याचा प्रयत्न केल्यास तें काम अल्प कालांत सहज होण्यास काय अशक्य आहे ? कारण सरकारच्या मुख्य अधिकाऱ्यांचा कल पाहून त्यांच्या मर्जीच्या धोरणाने हाताखालचे कामगार व प्रजेंतील प्रमुख लोक वागत असतात. ह्मणून व्हाइसराय साहेबांनी हे तंटे आपसांत युक्तीने मिटविण्याबद्दल इलाख्याच्या सरकारास आपली इच्छा दर्शविली तर इलाख्याचे गव्हर्नर साहेब, त्यांचे कौन्सिलदार, डिव्हिजनचे कमिशनर, जिल्ह्याचे कलेक्टर