पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९८) त्याबद्दल मी आपणांस नांव ठेवणार नाही, व कोणीही ठेवू नये अशी माझी समजूत आहे. पण माझी विनंती अशी आहे की. दोघांची गैरसमजूत होऊन ज्याला त्याला आपला पक्ष खरा व दुसऱ्याचा खोटा असे वाटत असते. यामुळे परस्परांची चांगली समजूत न पडतां तंट्यावर धांव जाते. दिवाणी असो किंवा फौजदारी असो, जेवढे तंटे सरकारापर्यंत जाऊन पोचतात त्यांचा उगम अशा प्रकारानेच झालेला असतो असे आढळते. तंट्याची मजल एकदां सरकारदरबारापर्यंत जाऊन पोचली झणजे दोन्ही पक्ष ईर्षेस पडतात, मग न्यायाच्या दरबारांतले दलाल कुळाची लायखी पाहून आपली तुंबडी भरण्याकरितां त्यांस भर देऊन चढीस लावितात. त्या योगाने दोन्ही पक्षांचा फार खराबा होऊन भिकेस लागण्याची वेळ येते, किंवा जवळचे द्रव्य जाऊन लोकांत छी थू झाली ह्मणजे देशत्यागही करावा लागतो. ह्या तंट्याचे पायीं अशी उदाहरणे घडलेली अनेक वेळ दृष्टीस पडतात. इंग्रज सरकारच्या छायेखाली राहणाऱ्या सधन व अब्रूदार लोकांची अशा रीतीने दुर्दशा होऊ देणे हे सरकारास व सरकारी अधिकाऱ्यांस देखील लांछनास्पद आहे. याकरितां आपसांतील तंट्याबखेड्याची सरकारी अमलाच्या जबरदस्तीने नव्हे, पण मित्रत्वाच्या व प्रजावात्सल्याच्या नात्याने कांही तरी निराळी तजवीज करून हिंदु व मुसलमान लोकांत पडलेली तेड मिटवून टाकावी, झणजे लोकांवर सरकारचे महदुपकार होतील. मध्यप्रदेश इंग्रज सरकारच्या ताब्यांत असून तो मुंबई इलाख्याच्या हद्दीस लागलेला आहे. त्यामध्ये १८ जिल्हे असून त्यांतही हिंदूंची व मुसलमानांची