पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९७ ) होऊन तो औषधोपचारांनी बरा होण्याची आशा न राहतां अवयव सडत चालला तर डाक्टर लोक त्याला कापून काढतात, ह्मणून डाक्टर हे आपले वैरी आहेत असे कधी न मानतां ते प्राणरक्षण करणारे आहेत असेंच आपण मानतो. त्याचप्रमाणे पोलीस किंवा न्यायाधीश आमच्याच वर्तनाप्रमाणे मन निष्टर करून कठोरपणा धारण करतात, ह्मणून ते आपले वैरी किंवा अहित करणारे होत असें कदापि मानणे प्रशस्त होणार नाही. कारण घरामध्ये आपलींच लहान मुले आपसांत परस्परांशी भांडून एकमेकांच्या मानेवर बसू लागली तर त्यांच्याच कल्या. णासाठी आपण त्यांजवर छडी उगारतों, व प्रसंगोपात्त दोन चमक्या देखील लगावतों, ह्मणून आपण त्यांचे वैरी समजले जात नाही. तीच कृति पोलिसाची व न्यायाधिशांची असते, असे विचाराने पाहणाराच्या लक्षात येईल. या सर्व वर्णनावरून दंगे करण्यापासून कोणासही यत्किंचित् लाभ नसून फारच मोठी हानी होते असे दिसून येईल. ह्मणून तसला घातक मार्ग लोकांनी सोडावा अशी प्रार्थना आहे. भाग पांचवा. विनंति. आमच्या दयाळू सरकारास, न्यायाधिशांस व पोलीसच्या मोठ्या अधिकाऱ्यांस हात जोडून विनंती आहे की, अपराधी लोकांस आपण कायद्याच्या धोरणाने पकडतां, कैदेत ठेवितां, न्यायाच्यावेळी पुराव्याने अपराध शाबीद होईल त्या मानाने लहान मोठ्या शिक्षाही देतां हे सर्व ठीक आहे.