पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काम होय. आपलें कुरूप असले तर आरशांत तसेंच दिसते, ह्मणून आपण आरशावर रुसत नाही, त्याप्रमाणे आपल्याच कृतीचा योग्य मोबदला पोलीसच्या अधिकाऱ्यांकडून किंवा न्यायाधीशाकडून मिळाला तर त्यांजवर रुसणे किंवा रागावणे व्यर्थ होय. त्यांच्या हातून आपला अपमान , व बेअब्रू होऊ नये अशी इच्छा करणारांनी आपल्याकडून होत असणाऱ्या दुष्कृतीचा त्याग करून कोणास उपद्रव । न देतां सुमार्गाने वागण्याचा निश्चय करावा, ह्मणजे ह्या ईग्रजी अमलांत कोणाकडूनही उपद्रव किंवा छल होणार नाही. हिंदु व मुसलमान हे सरकारचे दोन हात आहेत, ह्मणून एक अधिक व एक उणा असें मानण्याचे कांहीं कारण नाही. जे गैरचालीने वागून कायद्याच्या हुकुमाची पायमल्ली करूं पाहतात, त्यांचा पोलीसमार्फत तपास करून तेच पकडले जातात, व त्यांणी केलेल्या दुष्ट कृत्यांचा बार८ काईने शोध करून त्यांजवरील आरोपाची शाबिदी होण्या जोगी प्रमाणे व पुरावे जमा करितात, आणि मग त्यांना चौकशीकरितां न्यायाधीशापुढे उभे करतात. वास्तविक पाहिले तर असा प्रकार होत असून आपल्या कृतीचा विचार न करितां उगीच त्यांना नांवे ठेवणे हे मूर्खपणाचे काम होय. लोकांच्या जीवांच्या व मालमत्तेच्या रक्षणाकरितां पोलीस, पोलीसचे अधिकारी व न्यायाधीश यांच्या सरकाराने नेमणुका केल्या आहेत. ते आपले काम योग्य रीतीने बजावतात ह्मणून आपण त्यांना नांवें ठेविली तर त्यांत आपलेच नुकसान होईल, हे विचार करून पाहणारांस सहज दिसण्याजोगें आहे. आपल्या आंगच्या हस्तपादादि एखाद्या अवयवास रोग