पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८८) त्यापासून चालू पिढीचें तर नुकसान होणारच, परंतु पुढील पिढ्यांचेंहि होणार, ही गोष्ट त्याच्या ध्यानांत आल्यावांचून राहणार नाहीं. या कर्तव्य. परंतु हा देश ताब्यांत राखणे किंवा न राखणे ह्याचा त्यांनी दुसऱ्याहि एका दृष्टीनें विचार करणें जरूर आहे. ह्या देशासंबंधानें ह्या देशापासून त्यांना जे साक्षात् फायदे इंग्लिशांचें नीति- आहेत, त्यांसंबंधानेंच आतांपर्यंत आपण विचार केला. आतां ह्या देशाशीं असलेल्या त्यांच्या संबंधाचा आपण नीतिदृष्टया विचार करूं. अशा दृष्टीने विचार केला असतांहि, हा देश त्यांनी आपण होऊन सोडून देणें, किंवा आपल्या हातून जाऊं देणें, ही फार मोठी चूक होईल; एवढेच नव्हे, तर तो मोठा अपराध होईल. परकीय लोक आपल्या ताब्यांत असल्यामुळे आपणांवर त्यांच्या कल्याणाची फार मोठी जबाबदारी आहे, असा इंग्लिश लोकांना नेहमीं अभिमान वाटत असतो. कर्तव्यकर्माविषयीं अत्यन्त तत्प- रता, हा विशेष गुण त्यांचे पूर्वज जे प्यूरिटन ह्यां- पासून त्यांच्यामध्ये आला आहे; व ह्या गुणामुळे परकीय लोकांवर केवळ स्वार्थबुद्धीनें राज्य करण्याची कल्पनाहि त्यांच्या मनांत येत नाहीं. हा त्यांच्या मनाचा कल सांप्रत तर फार दृढ झाला आहे. सार्वभौमत्व असणे ही एक मोठी जबाबदारी आहे, अशी त्यांची समजूत एडमंड