पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८७) वास्तविक भरभराटीसाठी त्यांनी आजपर्यंत जी खटपट केली आहे, ती सर्व फुकट जाईल. अशा अंदाधुंदीच्या स्थितींत व्यापारामध्ये त्यांनी घातलेली भांडवलें फुकट जातील; आणि एवढ्या मोठ्या श्रमानें बांधिलेली त्यांची हिंदुस्थानची व्यापारसंबंधाच्या भरभराटीची इमारत ढास- ·कून जाऊन स्वप्नवत् होईल. अशा दुष्परिणामामुळे इंग्लंदावर जेभयंकर प्रसंग गुदरतील, त्याचें चित्र ह्याहून स्पष्ट वठविण्याची आव- श्यकता दिसत नाहीं. कित्येक वाईट प्रसंगांचा थोडा "बहुत अनुभव इंग्लिशांना आहेच. परंतु हिंदुस्थानासंबंधानें वरील प्रकारचा प्रसंग आल्यास ह्यापासून जे भयंकर परि- णाम त्यांच्यावर घडणार आहेत, त्यांच्या पासंगासहि ते मागील परिणाम लागणार नाहींत. लांकाशायरच्या व्यापाराचा समूळ नाश होईल; व यार्कशायरच्या व्या- • पाराला भयंकर धक्का बसेल. हिंदुस्थानापासून त्यांना हल्लीं अतोनात फायदा होत आहे, व त्यांच्या मुलां- नातवांसहि ह्या देशापासून पुढे मोठा द्रव्यलाभ व्हावयाचा . आहे; ह्या गोष्टींचा त्यांनी विचार केला असतां ह्या देशाच्या भावी परिणामाविषयीं उदासीन राहण्यास त्यां- • च्यापैकी कोणी क्षणभर देखील तयार होणार नाहीं; व • हा देश ताब्यांत राखण्यास ज्या ज्या गोष्टी करणे जरूर पडेल, त्या त्या करण्याविषयीं कधीहि पाऊल मागें • घेणार नाहीं. कारण अशा प्रकारची हयगय केली असतां