Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८९) बर्क ह्याच्या वेळेपासून झाली असून हिंदुस्थानासंबंधानें तर ही समजूत फार दृढ झाली आहे. म्हणून केवळ स्वा- र्थासाठीं तो देश आपल्या ताब्यांत ठेवावयाचा, हा विचार त्यांनी अगदीं सोडून दिला पाहिजे. अमुक एक प्रमाणापर्यंत उत्तम प्रकारची राज्यव्यवस्था आपणांस हिंदुस्थानांत ठेवावयाची आहे, असे धोरण त्यांनी ठेविलें आहे; आणि येथील नेटिव्ह लोकांच्या भोळ्या व वेड- सर समजुतींत हात न घालितां पाश्चिमात्य सुधारणांपैकी उत्तम सुधारणा ह्या देशांत हळू हळू सुरू करण्याचा त्यांचा मुख्य हेतु आहे. कायद्यांची समता, छापखा- न्यांचे स्वातंत्र्य आणि विद्या, हीं त्यांनी येथील लोकांस दिली आहेत; व युरोपियन लोकांच्या श्रमानें लागले- ल्या शोधांपासून जे फायदे इंग्लिशांस होऊं लागले आहेत, ते सर्व फायदे (आगगाड्या, तारायंत्रें वैगैरे ) त्यांनी ह्या देशांतील लोकांस करून दिले आहेत. तेव्हां इंग्लिश लोकांच्या बुद्धिसामर्थ्यामुळे, त्यांच्या स्वार्थ- पराङ्मुखतेमुळे आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे हिंदुस्थानांत ज्या ह्या अनेक सुधारणा झाल्या आहेत, त्या जर त्यांनी बुद्धिपुरःसर रानटी व जुलमी रशियन लोकांच्या स्वाधीन केल्या, किंवा ह्या देशांतील झोटिंग पातशाही, दरोडे, दंगेधोपे, ह्यांच्या गडबडीत सोडून दिल्या, तर इतिहासांत त्यांच्याविषयी काय उद्गार निघतील ? हा देश सोडून देणे किंवा आपल्या हातून