पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आतां हिंदुस्थानास ३ गोष्टींची उणीव आहे: - ( 1 ) येथील शेतकीची रीति अव्यवस्थित आहे; ( २ ) येथें पाण्याचा पुरवठा कमी आहे; व ( ३ ) येथें दळण- वळणाच्या सोई कमी आहेत. पहिल्या मुद्दयाच्या संबंधानें ग्रेट ब्रिटन व आयलमध्यें ज्याप्रमाणें जमिनीची लागवड करण्यांत येते, त्यापेक्षां हिंदुस्थानांतील जमिनीच्या लाग वडीचें पाऊल हल्लीं फार मागें आहे. उदाहरणार्थ, इंग्लंदांत गव्हाचे पीक सरासरी एका एकरामागें १७ बुशील आहे; परंतु हिंदुस्थानांत फक्त ११ बुशील आहे; व ह्याचें कारण उघड आहे. तें हेंच की, ह्या देशांतील एकहि शेतकरी खतांचा चांगला उपयोग करत नाहीं; तसेंच फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या लांकडी नांगरांनीच तो जमीन नांगरतो; आणि शेतकीच्या दुसऱ्या कृतींच्या संबंधानें यंत्रांचा उपयोग त्याला बहुधा माहि- तच नसतो. इंग्लंदांतील जमिनीप्रमाणें ह्या देशांतील लागवड जमिनीची जर शास्त्रीय रीतीने लागवड केली तर ४१,००,००,००० लोकांस पुरेसें धान्य तींत सहज उत्पन्न होईल. शेतकीच्या संबंधाने ह्या देशांत लवक- रच सुधारणा होईल, ह्यांत शंका नाहीं; व ही सुधारणा सुरू झाली म्हणजे वाफेनें चालणारे नांगर व शेतकीचीं इतर हत्यारे करणाऱ्या इंग्लंदांतील कारागिरांस पुष्कळ काम मिळून त्यांचा व्यापार वाढणार आहे. परंतु लागवड करण्यासारखी हिंदुस्थानांत जी ((26)