पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७९),

पाट बंधाऱ्यांची आवश्यकता. एकंदर जमीन आहे, तिच्यापैकीं फारच थोड्या भागाची हल्ली लागवड होत आहे. कांहीं प्रांता- तून तर लागवड जमिनीच्या ७ पट लाग- वड होण्यासारखी जमीन पडीत राहिलेली आहे. प्रायः हैं प्रमाण ३ : १ आहे; म्हणजे लागवड. जमिनीच्या तिप्पट पडीत जमीन आहे; व सिंधुनदीच्या कांठचा सुंदर मळईचा भाग अद्यापि देखील पडीत राहिला आहे. अशा प्रकारें जमीन पडीत राहण्याचें मुख्य कारण पाण्याची कमताई. इंग्लंदांत तेथील शेतकरी पाणी पुष्कळ म्हणून ओरडतात, हिंदुस्थानांत कमी म्हणून ओरडतात. हिंदुस्थानांत कोठें कोठें पाऊस फार कमी पडतो; म्हणून पिकांना केव्हां केव्हां पाटाच्या पाण्यावरहि अवलंबून रहावें लागतें. ह्या गोष्टीच्या महत्त्वाची थोडी बहुत कल्पना करितां यावी, म्हणून ईजिप्त देशाची स्थिति लक्षांत आणा. सुपीकपणाविषयीं त्या देशाची नेहमीं प्रसिद्ध आहे. परंतु नैल नदीचें पाणी पाट बंधा-यांनी जेथपर्यंत नेतां येतें, तेथपर्यंतच काय ती तेथील जमीन सुपीक ह्या संबंधानें ईजिप्त देशा- चें उदाहरण. असते. ईजिप्तमध्ये पाटबंधाऱ्यांचे काम शेंकडों वर्षे सुरू आहे; हिंदुस्थानांत त्या कामास नुकताच आरंभ ही गोष्ट जास्त झाला आहे, असें म्हटलें तरी चालेल. स्पष्ट करून सांगण्यासाठीं इ. स. १८०५ च्या " नाइ-