पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७७)

वाट हि आहे." म्हणेज युनाय्तेद स्तेत्समधील गव्हांच्या पिकास जर जबर धक्का बसला, किंवा इंग्लंदांत व त्या संस्थानांत जर लढाई उत्पन्न झाली तर हिंदुस्थानांतून इंग्लिशांस गव्हांचा फारच मोठा पुरवठा होईल. हा देश जोपर्यंत त्यांच्या ताब्यांत आहे, व सुएझचा कालवा जोंपर्यंत जाण्या येण्यास खला आहे,तोंपर्यंत भाकर महाग होण्याची भीति बाळगिण्याचें इंग्लिशांस कारण नाहीं, असें म्हटलें असतां त्यांत कांहीं अतिशयोक्ति नाहीं.

 गेल्या पांच वर्षांत साधारणपणे पाहिलें असतां व्यापार जरी विशेष जोरावर नव्हता, तरी देखील इंग्लि- शांनी हिंदुस्थानांत जो माल पाठविला, त्याचें प्रमाण त्या मुदतीत फार वाढले आहे. पांच वर्षांत त्यांचा कापडाचा 7 नें वाढला, आगगाडीचें सामान दीडपट पूं लागले, लोकरीच्या जिनसांचा व्यापार नें वाढला, आणि व्यापार ३ बूट व जोडे पूर्वीच्या जवळ जवळ दुप्पट खपूं लागले. हिंदुस्थानाशी त्यांचा व्यापार आजपर्यंत कोणत्या प्रमाणाने चालत आला आहे, ह्याचा आतांपर्यंत आपण विचार केला. आतां ह्याच्या भावी स्थितीचा विचार करूं. एतद्देशीय लोकांस ज्या वस्तूंची गरज लागेल त्याच वस्तु इंग्लिश लोक विकणार हे उघडच आहे. म्हणून हिंदुस्थानच्या स्थितीची सुधा- रणा. ब्रिटिश व्यापाराची भावी स्थिति हिंदु- स्थानच्या सुधारणेवर अवलंबून आहे.