पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६६)

सारांश, २ नेटिव्ह शिपायांस १ इंग्लिश शिपाई हैं प्र- माण हल्लीं आहे. १८५७च्या बंडापूर्वी हें प्रमाण ३ : १ होतें; व कंपनीच्या अमुलाच्या प्रारंभी तर कधीं कधीं ५:१ होतें.
 इतकें मोठें लष्करी सैन्य व शिवाय पोलीस सैन्य ठेवणे मोठ्या खर्चाचें काम आहे, हें उवड आहे. तथापि हा एकंदर व हिंदुस्थानच्या तिजोरींतून चालला आहे. वसूल गोळा करणें हें काम हिंदुस्थानांत फारच सोपें येथील जमेच्या आहे. फक्त बंगाल्यांत मात्र मोठ मोठे बावी. पुष्कळ जमीनदार आहेत. ते इंग्लंदा- तल्याप्रमाणें आपल्या जमिनी शेतकऱ्यांस लागवडीस देतात. ह्याशिवाय इतर सर्व ठिकाणच्या जमिनींवर सर - कारचें पूर्ण स्वामित्व आहे; व लागवड करणाऱ्यापासून भाड्यादाखल सरकार धारा घेते; आणि हिंदुस्थानांतील जमाबंदीची मुख्य बाब हीच आहे. जमिनीच्या धाया- शिवाय मिठावर कर आहे. दरसाल दर माणशी सुमा- रें ७ पेन्स ह्या प्रमाणाने हा कर आहे. बाकीच्या जमे- च्या बाबी म्हटल्या म्हणजे अफूवरील कर, कष्टमचे कर, वगैरे होत. इन्कम टॅक्स [प्राप्तीवरील कर ] हिंदुस्थानांत


xअलीकडे ५०० रुपयांपेक्षां ज्यांचें सालीना उत्पन्न जास्त आहे, असे सर्व व्यापारी, शेट सावकार, सरकारी कामगार, वगैरे ह्यांजवर दरसाल दर रुपयास ४ प्रमाणे इन्कम टॅक्स बसविला आहे. मात्र २०० • रुपयांहून अधिक टॅक्स कोणावर नसतो.