पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६७)

मुळींच नाहीं; व ह्यामुळे ज्यांच्या जमिनी नाहींत, परंतु जे व्यापारी किंवा सावकार आहेत, त्यांच्यापासून सरका- रच्या तिजोरीत फारच थोडा पैसा जातो.
 हिंदुस्थानांतील सैन्यास ३ धोक्यांच्या संबंधाने सावधगिरी ठेवावी लागते; ( १ ) नेटिव्ह संस्थानि- कांचें त्यांच्या ३,८०,००० सैन्यासह बंड; ( २ ) ब्रिटिश हिंदुस्थानांतच वंडाचा उद्भव व (३) परराष्ट्राची स्वारी. ज्याच्या संबंधानें हल्ली फार भीति आहे, तो ३रा धोका या देशाचे होय; कारण परराष्ट्राची मदत आल्याशिवाय संरक्षण. पहिले दोन धोके येण्याची हल्ली फारशी भीति नाहीं. इंग्लिशांना मोठी भीति काय ती रशियाची आहे. रशियन लोकांना हल्ला करणें झालें तर अफगाणिस्थानांतील दोन रस्त्यांपैकी कोणत्या तरी रस्त्यानें केला पाहिजे. पहिला रस्ता काबुल व खैबर खिंडीमधून, व दुसरा कंद- हार व केटावरून. ह्या दोहोंतून कोणत्याहि रस्त्यावर आपलीं सैन्यें आपणांस त्वरित गोळा करितां यावी, हा हिंदुस्थान सरकारचा हल्लींचा मुख्य हेतु आहे; व म्हणून हिंदुस्थानांतील मोठमोठ्या रेलवेच्या रस्त्यांची अशी व्यवस्था केलेली आहे कीं, तिच्या योगानें कलकत्ता, मद्रास व मुंबई ह्यांचा ह्या सरहद्दीशीं निकट संबंध जो- डिला गेला आहे.. तसेच सिंधु नदीच्या मुखापाशीं असणाऱ्या कराची शहरापासून खैबर खिंडीशीं असले- ल्या पेशावर शहरापर्यंतहि रेलवे रस्ता केला आहे: