Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६५ )

 ही स्थानिक स्वराज्याची स्थिति झाली. देशां- तल्या देशांत स्वस्थता राखण्याचे काम हिंदुस्थानांत फार सुलभ आहे. हिंदुस्थानांत दर १२०० मनुष्यांस १ ह्या प्रमाणाने पोलिसची संख्या आहे; परंतु इंग्लिश लोक कायदेशीर रीतीनें अधिक भांडणारे असल्यामुळे इंग्लंदांत दर ६३५ मनुष्यांस १ ह्या प्रमाणाने पोलीस लागतात. न्यायाची सत्ता व अंमल बजाविण्याची सत्ता ह्या निरनि- राळ्या अधिकान्यांकडे आहेत. तसेंच दिवाणी व फौजदारी खटल्यांच्या चौकशीकरितां इंग्लंदांतल्याप्रमाणेंच हिंदुस्थानांतहि कोची मालिका आहेच. कलकत्ता, मद्रास, मुंबई व अलाहाबाद येथें हायकोर्ते आहेत. हायकोर्टाच्या जज्यांपैकी बहुतेक इंग्लिश असून थोडे नेटिव्ह असतात. येथें चालणारे दिवाणी कायदे कांहीं अंशीं देशाच्या चालीरितींस धरून व कांही अंशी इंग्लिश काय- द्यांस धरून ठरविलेले आहेत. तसेंच लाई मेकाले ह्या विख्यात बुद्धिमान् पुरुषानें केलेल्या नियमांच्या आधा रा फौजदारी कायदे ठरविलेले आहेत. देशाच्या संर- ह्या देशांतील क्षणास जें सैन्य आहे त्यांत इंग्लिश सुमारें सैन्य. * ६०,००० आहेत; व नेटिव्ह त्यांच्या दुप- टीहून म्हणजे १,२०,००० हून कांहीं अधिक आहेत.


  • १८८७ मध्ये हे आंकडे पुढे लिहिल्याप्रमाणे होते:- युरोपियन ६९, ७६४; नेटिव्ह १,४१,०००; मिळून एकंदर सैन्य

२,१०,७६४.