पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६०)

प्रधानमंडळ असले, व व्हाइसराय स्वतः कान्सव्हेटिव मताचा असला, तरी त्याला लिबरल पक्षाच्या मताप्रमाणें राज्यकारभार करावा लागतो; व असें करण्यास तो कबूल नसेल तर तो राजीनामा देऊन जातो. "व्हाइसराय" हा हुद्दा त्याला अलीकडे मिळालेला आहे; परंतु ह्याचा वास्त विक फारा दिवसांचा हुद्दा " गव्हर्नर जनरल" हा होय. मुंबई, मद्रास व बंगाल ह्या तीन इलाख्यांच्या गव्हर्नरां- वर बंगालच्या गव्हर्नरास मुख्य नेमून त्यालाच "गव्हर्नर जनरल" हा हुद्दा दिला; व ही व्यवस्था इ. स. १७७३त झाली. ह्याला मदत करण्यास एक मंत्रिमंडळ ( कौन्सि- ल) असतें. त्यांत ७ सभासद असतात; व त्यांना आर्डिनरी (साधारण) सभासद म्हणतात; आणि त्यांची नेम- णूक राणीच्या वतीनें हिंदुस्थानचें स्टेट सेक्रेटरी करितात. ह्या सातांमध्यें एक नेहमीं हिंदुस्थानचा सेनाधिपति असतो. तसेंच त्यांत एक नेहमीं जमाखर्च पाहणारा (फिनॅन्शल ) सभासद असतो; व एक कायद्यांसंबंधी (लीगल ) सभासद असतो. साधारणपणे पाहिले अस तां ह्या मंत्र्यांच्या बहुमताप्रमाणे व्हाइसरायानें वागाव- याचे; परंतु विशेष प्रसंगी त्यांचें मत एकीकडे ठेवून आपल्याच मताप्रमाणें तो वागतो. ह्या जणांच्या प्रधानमंडळास एक्झिक्यूटिव्ह ( प्रवर्तक ) कौन्सिल म्हण- तात. कायदेकानू करण्यासाठीं व्हाइसराय आणखी कांहीं सभासद नेमितात; व त्यांना आडिशनल ( अधिक )