पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५९ )

जास्त आहे. म्हणून राणी सरकारच्या प्रत्यक्ष अमला- नालीं असणारी लोकसंख्या सुमारें २० कोटि राहिली.
 हिंदुस्थानचा राज्यकारभार समजून घेणें फार घोटाळ्याच आहे. कंपनीची राज्यपद्धति व इंग्लिश राज्य- हिंदुस्थानची पद्धति ह्यांच्या संमेलनामुळे हा घोटाळा झाला राज्यपद्धति. आहे. ह्यांतील महत्त्वाच्या गोष्टी पुढे थोडक्यांत सांगि- तल्या आहेत. इंग्लिश राज्यपद्धतीच्या नियमाप्रमाणें हिंदुस्थानासंबंधी सर्व राज्याधिकार राणी आपल्या एका प्रधानाच्या द्वारे चालविते; व एकंदर राज्यकारभाराबद्दल ह्या प्रधानाला पार्लमेंट सभा जबावदार धरिते. ह्याला " सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया " ( हिंदुस्थानचा स्टेट सेक्रेटरी ) म्हणतात. हा इंग्लंदच्या मंत्रिमंडळामध्ये ( क्याविनेटमध्ये ) असावयाचाच. स्टेट सेक्रेटरीस मदत करण्याकरितां एक कौन्सिल म्हणजे मंत्रिसभा असते. हिंदुस्थानासंबंधी कामकाजांचा ज्यांना अनुभव असतो, असेच सभासद ह्या सभेत असतात; व त्यांची नेमणूक राजाकडून होते. परंतु त्यांच्या अभिप्रायाप्रमाणें वागलेच पाहिजे, असे बंधन स्टेट सेक्रेटरीवर नाहीं. त्याच्या भजीस वाटेल तेव्हांच तो ह्या सभासदांच्या अभिप्रायाप्रमाणे चालतो.
 राणी सरकारचा हिंदुस्थानांतील प्रतिनिधि व्हाइ- सराय हा होय. ज्या पक्षाच्या प्रधानमंडळाकडे अधि- कार असतो, त्या पक्षाच्या मताप्रमाणेंच बहुधा अलीकडे व्हाइसराय राज्यकारभार पाहतो, म्हणजे लिबरल पक्षाचें