पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५६ )

ही वस्ती फार दाट आहे. उदाहरणार्थ, बंगालचा विस्तार फ्रान्स इतका आहे; परंतु तेथील लोकसंख्या फ्रान्सपेक्षां सुमारे २,८०,००,००० जास्त आहे. असें आहे तरी बंगाल्यांतील कित्येक जिल्ह्यांत डोंगरांच्या आजू- बाजूचा मुलूख व कित्येक जंगले ह्यांतून वस्ती मुळींच नाहीं. ह्या देशांतील लोकसंख्येपैकीं निमेहून अधिक लोक शेत- कीत गुंतलेले आहेत. सर्व लोकसंख्येपैकी शेकडा ८०चा संबंध शेतकीशी असतो; व इंग्लंदांत शेकडा ८ जणांचाच असतो. तेव्हां एकंदरीनें हिंदुस्थान हें कच्चे पदार्थ उत्पन्न करण्याकडे सर्वांशीं लागलेलें आहे, असें मानिलें पाहिजे, म्हणून इंग्लंदुची स्थिति ह्या देशाच्या स्थितीच्या अगदी उलट आहे, असे सहज ध्यानांत येईल, इंग्लंदांतील कारखाने व इंग्लंदचा व्यापार हीं दरसाल वादत आहेत. हिंदुस्थानांत शेतकऱ्यांशिवाय राहिलेल्या लोकांचे धंदे म्हटले म्हणजे उदीम व्यापार, कापड तयार करणे, धातूंची व मातीची भांडी करणें, वगैरे आहेत व बरेच लोक केवळ भिक्षा मागून चरितार्थ करणारे आहेत. ज्या लोकसमूहावर राज्य करण्याचें जोखीम इंग्लिशांवर पडलें आहे, तो वरील प्रकारचा आहे.
 हिंदुस्थानांतील प्रदेशाचे दोन मुख्य भाग आहेत. १ला भाग म्हणजे खुद्द ब्रिटिश सरकारच्या ताबयां-' तील प्रदेश व २रा भाग म्हणजे नेटिव्ह संस्थानिकां- च्या ताब्यांतील प्रदेश. मागील प्रकरणांत सांगितल्या-'