पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५५ )

नाहीं, असें इंग्लंदांतील मजूर व त्यांच्या वायका नेहमी म्हणतात; परंतु ही त्यांची मोठी चूक आहे हिंदुस्थान इंग्लिशांच्या ताव्यांत राहणे, ही गोष्ट इंग्लंदांतील कोणत्याहि स्थितींतील मंडळीला जितकी महत्त्वाची आहे, तितकीच ती मजुरांनाहि आहे; व हें पुढील एकंदर हकीगतीवरून स्पष्ट होईल. तसेंच ह्या देशाशी इंग्लिशांचा जो संबंध आहे, त्याचे महत्त्व सांप्रत पुष्कळ वाढले आहे, अद्यापि वाढत आहे, व पुढेहि वाढणार आहे. ह्या सर्व गोष्टी स्पष्ट रीतीनें कळून येण्यास बरेच आंकडे विचारांत घ्यावे लागतील.
 प्रथमतः हिंदुस्थानचा आकार केवढा आहे, व येथील लोकसंख्या किती आहे, याचा विचार करूं. हिंदुस्थानची लोकसंख्या. मागें दाखविलेच आहे कीं, रशि- या खेरीज सर्व युरोप खंडाचा जेवढा विस्तार आहे, तेवढा एकट्या हिंदुस्थानाचा आहे. परंतु युरोप खंडांतील तेवढ्याच प्रदेशाची लोकसंख्या सुमारे २४ कोटि असून हिंदुस्थानची २५ ॥ कोटि आहे. (पृष्ठ १८ मधील टीप पहा.) म्हणून हिदुस्थानशीं इंग्लि- शांचा व्यापार म्हणजे, रशियाखेरीज सगळ्या युरोप खंडां- तील लोकसमूहापेक्षां जास्त लोकसमूहाशीं त्यांचा व्यापार असे स्पष्ट झाले; व अशा दृष्टीनेच ह्या व्यापाराचा त्यांनी विचार केला पाहिजे. हिंदुस्थानची ही २९ कोटिप्रजा सर्व प्रदेशांत सारखी वाटलेली नाहीं. नद्यांच्या कांठीं